पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

स्वामी चिन्मयानंद यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी

स्वामी चिन्मयानंद

माजी केंद्रीय मंत्री स्वामी चिन्मयानंद यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. अटकेनंतर उत्तर प्रदेशच्या शाहजहांपूर येथील स्थानिक न्यायालयात त्यांना हजर करण्यात आले होते. न्यायालयाने त्यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली आहे. बलात्काराचा आरोप असलेल्या स्वामी चिन्मयानंद यांनी शुक्रवारी सकाळी पोलिसांनी अटक केली.

देशातील कंपन्यांसाठीच्या कॉर्पोरेट करात कपात, सीतारामन यांची घोषणा

स्वामी चिन्मयानंद यांच्यावर त्यांच्याच लॉ कॉलेजमध्ये शिकणाऱ्या एका विद्यार्थिनीने बलात्काराचा आरोप केला होता. पीडित तरुणीने आणि तिच्या वडिलांनी चिन्मयानंद यांच्याविरोधात तक्रार दाखल केली होती. याप्रकरणी शुक्रवारी सकाळी एटीएस आणि उत्तर प्रदेश पोलिसांनी चिन्मयानंद यांना अटक केली. शहाजहांपूरन येथील आश्रमातून चिन्मयानंद यांना अटक करण्यात आली. अटकेनंतर त्यांना शहाजहांपूर येथील राजकीय मेडिकल कॉलेजमध्ये वैद्यकिय तपासणीसाठी नेण्यात आले होते.  

अर्थमंत्र्यांच्या घोषणांनंतर मुंबई शेअर बाजारात उसळी