पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

स्वामी चिन्मयानंद यांना आरोप मान्य, स्वतःचीच लाज वाटत असल्याचे वक्तव्य

स्वामी चिन्मयानंद यांना आरोप मान्य, स्वतःचीच लाज वाटत असल्याचे वक्तव्य

१४ दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत रवानगी झालेले भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी गृहराज्यमंत्री स्वामी चिन्मयानंद यांनी त्यांच्यावर करण्यात आलेले बहुतांश आरोप मान्य केले आहेत. स्वामी चिन्मयानंद यांनी मसाज आणि लैंगिक संभाषणासह त्यांच्यावर करण्यात आलेले सर्व आरोप मान्य केल्याचे या खटल्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या विशेष तपास पथकाचे प्रमुख नवीन अरोरा यांनी दिली.

एसआयटी प्रमुख म्हणाले की, परिस्थितीजन्य पुराव्यांचा तपास केला जात आहे. स्वामी चिन्मयानंद यांना आपल्या कृत्यावर लाज वाटते. त्यामुळे यावर आता जास्त काही बोलू इच्छित नसल्याचे म्हटले आहे.

स्वामी चिन्मयानंद यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी

नवीन अरोरा हे पत्रकार परिषदेत बोलत होते. चिन्मयानंद यांना मसाजचा व्हिडिओ दाखवण्यात आला. यावर चिन्मयानंद यांनी सर्वांना माहीतच झाले आहे. तर आता यावर मला काही म्हणायचे नाही. मी माझा गुन्हा मान्य करतो आणि माझे हे कृत्य लाजीरवाणे असल्याचे म्हटले. 

अधिकाऱ्यांनी सांगितले की, चिन्मयानंद यांना अटक करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेण्यात आला. एसआयटीने मोबाइल कॉल डिटेल्सचे डिजिटल रेकॉर्ड आणि टोल नाक्यावरचे फुटेज मिळवले आहे. 

VIDEO: भाजप नेत्याने पक्ष कार्यालयाबाहेर पत्नीला केली मारहाण

तत्पूर्वी, चिन्मयानंद यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. अटकेनंतर उत्तर प्रदेशच्या शाहजहांपूर येथील स्थानिक न्यायालयात त्यांना हजर करण्यात आले होते. न्यायालयाने त्यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली आहे. बलात्काराचा आरोप असलेल्या स्वामी चिन्मयानंद यांनी शुक्रवारी सकाळी पोलिसांनी अटक केली.