पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

स्वामी चिन्मयानंद यांच्यावर लैंगिक शोषणाचा आरोप करणारी तरुणी सापडली

स्वामी चिन्मयानंद

माजी केंद्रीय मंत्री आणि भाजपचे नेते स्वामी चिन्मयानंद यांच्यावर लैंगिक शोषणाचा आरोप करणारी तरुणी सापडली आहे. रहस्यमय पध्दतीने बेपत्ता झालेली ही तरुणी शुक्रवारी सकाळी राजस्थानमध्ये सापडली आहे. उत्तर प्रदेशचे डीजीपी ओ. पी. सिंह यांनी ही माहिती दिली. सिंह यांनी सांगितले की, 'शाहजहांपूर प्रकरणातील बेपत्ता झालेली तरुणी सापडली आहे. या मुलीचे अपहरण केल्याचा आरोप लावण्यात आला होता. मात्र ती तरुणी राजस्थानमध्ये सापडली आहे.' तर, या प्रकरणावर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी होत आहे त्या दरम्यान या तरुणीला कोर्टासमोर हजर करण्यात येणार आहे. 

शशी थरुर यांनी पुन्हा मोदींचे केले कौतुक, आव्हानही स्वीकारले

उत्तर प्रदेशच्या शाहजहांपूरमधील एका तरुणीने भाजपचे नेते स्वामी चिन्मयानंद यांच्यावर लैंगिक शोषणाचा आरोप केला होता. २३ ऑगस्टला या तरुणीने हा आरोप केला होता त्यानंतर दुसऱ्या दिवशीच ही तरुणी बेपत्ता झाली होती. पोलिस या तरुणीचा शोध घेत होते. सिंह यांनी पुढे असे सांगितले की, 'पोलिसांच्या टीम गेल्या चार-पाच दिवसांपासून या तरुणीचा शोध घेत होती. ती राजस्थानमध्ये सापडली आहे. या तरुणीला पोलिस शाहजहांपूरला घेऊन येत आहेत.'

नव्या भारतामध्ये तरुणांच्या आडनावाला महत्त्व नाही - मोदी

दरम्यान, शाहजहांपूरमधील चिन्मयानंद यांच्या  स्वामी शुकदेवानंद  महाविद्यालयामध्ये ही तरुणी शिक्षण घेत आहे. तिने सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल करत चिन्मयानंद यांच्यावर अनेक आरोप केले होते. व्हिडिओमध्ये या तरुणीने चिन्मयानंद यांनी लैंगिक शोषणे केले तसंच त्यांनी मला जीवे मारण्याची धमकी दिली असल्याचे सांगत सरकारी मदतीची मागणी केली होती. २४ ऑगस्ट रोजी तीने फेसबुकवर हा व्हिडीओ अपलोड केला होता. त्यानंतर दुसऱ्या दिवशीच ही तरुणी बेपत्ता झाली होती. या व्हिडीओमध्ये तिने मला आणि माझ्या कुटुंबियांच्या जीवाला धोका असल्याचे म्हटले होते. 

सार्वजनिक कार्यक्रमात बोलू नका, प्रज्ञासिंह ठाकूर यांना भाजपचे आदेश

दरम्यान, या प्रकरणी तरुणीच्या वडिलांनी शाहजहांपूर पोलिस ठाण्यामध्ये चिन्मयानंद यांच्याविरोधात अपहरण आणि जीवे मारण्याची धमकी दिली असल्याचा आरोप करत तक्रार दाखल केली होती. त्यानंतर पोलिसांनी चिन्मयानंद यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला. हे प्रकरण सुप्रीम कोर्टापर्यंत पोहचले आहे. दरम्यान, भाजप नेते स्वामी चिन्मयानंद हे ३ वेळा खासदार झाले होते. तसंच त्यांनी केंद्रामध्ये गृहराज्यमंत्री पद देखील संभाळले होते. या प्रकरणामुळे त्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. 

मेट्रो-३ साठी आरेतील २१८५ झाडे तोडणार; वृक्षतोडीला हिरवा कंदील