पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

सुषमा स्वराज, सुमित्रा महाजन यांची संसदीय कारकीर्द समाप्त

सुषमा स्वराज आणि सुमित्रा महाजन

देशाच्या माजी परराष्ट्र मंत्री व लोकसभेतील भाजपचा 'आवाज' ठरलेल्या नेत्या सुषमा स्वराज आणि सोळाव्या लोकसभेच्या अध्यक्षा सुमित्रा महाजन यांची संसदीय कारकीर्द समाप्त झाल्याचे स्पष्ट झाले आहे. या दोन्ही नेत्यांनी संसदेच्या माजी सदस्या म्हणून ओळखपत्र मिळण्यासाठी अर्ज दाखल केला आहे. याचा अर्थ या दोन्ही नेत्या पक्षाकडून राज्यसभेत जाणार नाही, हे स्पष्ट झाले आहे.

सुषमा स्वराज (वय ६७) आणि सुमित्रा महाजन (वय ७६) या दोघींनी मध्य प्रदेशमधील अनुक्रमे विदिशा आणि इंदूर या लोकसभा मतदारसंघाचे बरीच वर्षे नेतृत्त्व केले. पण यंदाची निवडणूक त्यांनी लढविली नव्हती.

पुणेकरांना हेल्मेट वापरावेच लागणार, मुख्यमंत्र्यांचे स्पष्टीकरण

२०१९ मधील लोकसभा निवडणूक मी लढविणार नाही, असे सुषमा स्वराज यांनी गेल्यावर्षीच जाहीर केले होते. तब्येतीच्या कारणामुळे आपण हा निर्णय घेतला असल्याचे त्यांनी म्हटले होते. अर्थात त्यावेळी त्यांनी सक्रीय राजकारणातून आपण निवृत्ती घेणार नसल्याचे म्हटले होते. लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर बरेच दिवस भाजपकडून सुमित्रा महाजन यांना उमेदवारी जाहीर न झाल्यामुळे त्यांनी स्वतःहून पक्षाला पत्र लिहिले होते आणि आपण निवडणूक लढविण्यास इच्छूक नसल्याचे सांगितले होते. पक्षाने नवा उमेदवार कोण असावा, हे निर्धास्तपणे ठरवावे, असे त्यांनी म्हटले होते. या दोघींकडून लोकसभेच्या माजी सदस्य म्हणून ओळखपत्र मिळण्यासाठी अर्ज करण्यात आल्याने त्यांच्या कारकीर्दीचा शेवट झाल्याचे स्पष्ट झाले.

सुमित्रा महाजन यांनी सर्वात आधी सोमवारीच संसदेच्या नोटीस कार्यालयाकडे अर्ज सादर करून ओळखपत्र मिळण्याची विनंती केली. त्यांची विनंती तात्काळ मान्य करण्यात आली आणि मंगळवारी त्यांना ओळखपत्र जारी करण्यात आले. सुमित्रा महाजन यांचे सहायक पंकज क्षीरसागर यांनी 'हिंदूस्थान टाइम्स'कडे त्यांना ओळखपत्र मिळाल्याला दुजोरा दिला. 

लोकसभेतील काँग्रेसच्या गटनेतेपदी अधीर रंजन चौधरी

सुषमा स्वराज यांनी आपल्या अर्जाबाबत जाहीरपणे काहीही सांगितले नाही. पण लोकसभेच्या सचिवालयाने सुषमा स्वराज यांच्याकडून मंगळवारी अर्ज मिळाला असल्याचे सांगितले. त्यांचे माजी सदस्य ओळखपत्र लवकरच जारी केले जाईल, असे सचिवालयाने स्पष्ट केले.

सुमित्रा महाजन या सलग आठ वेळा लोकसभेच्या सदस्या होत्या. तर सुषमा स्वराज या सात वेळा या सभागृहाच्या सदस्या होत्या.