पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

सुषमा स्वराज यांना पाहताच महाशय धर्मपाल गुलाटींना अश्रू अनावर

सुषमा स्वराज यांना पाहताच महाशय धर्मपाल गुलाटींना अश्रू अनावर(ANI)

माजी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांच्यावर राजकीय इतमामात बुधवारी दुपारी अंत्यसंस्कार करण्यात आले. ६७ वर्षीय भाजपच्या ज्येष्ठ नेत्या सुषमा स्वराज यांचे मंगळवारी रात्री ह्र्दयविकाराच्या झटक्याने निधन झाले होते. त्यांची मुलगी बासुरीने यांना मुखाग्नी दिला. सुषमा स्वराज यांचे अंतिम दर्शन घेण्यासाठी त्यांच्या घरी व भाजपच्या मुख्यालयात मोठी गर्दी झाली होती. भाजपच्या मुख्यालयात सुषमा स्वराज यांचे अंतिम दर्शन घेण्यासाठी आलेले 'एमडीएच' मसाल्याचे संस्थापक महाशय धर्मपाल गुलाटी अत्यंत भावूक झाले होते. त्यांना अश्रू अनावर झाले.

सुषमा स्वराज यांचे पार्थिव अनंतात विलिन

'एएनआय'ने याबाबतचा एक व्हिडिओ प्रसिद्ध केला आहे. यामध्ये सुषमा स्वराज यांच्या पार्थिवाचे दर्शन घेताना महाशय धर्मपाल गुलाटी भावूक होऊन रडत होते. त्यावेळी तिथे उपस्थित असलेल्या काहींनी त्यांना सावरण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, दिल्लीतील लोधी स्मशानभूमीत सुषमा यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. मुलगी बासुरी यांनी सुषमा यांना मुखाग्नी दिला. यावेळी सुषमा स्वराज यांचे पती स्वराज कौशल हेही उपस्थित होते. 

सुषमा स्वराज यांना श्रद्धांजलीसाठी स्मृती इराणी यांचे भावूक ट्विट

सुषमा यांना अत्यंत शोकाकुल वातावरणात अखेरचा निरोप देण्यात आला. राष्ट्रपती रामनाथ कोविंद, उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू, पंतप्रधान नरेंद्र मोदी, माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग, लोकसभेचे सभापती ओम बिर्ला, भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी, यूपीए अध्यक्षा सोनिया गांधी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, काँग्रेस नेते राहुल गांधी, बसपाच्या सर्वेसर्वा मायावती, सपा नेते मुलायमसिंह यादव, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्यासह विदेशातीलही विविध मान्यवरांनी सुषमा यांचे अंत्यदर्शन घेऊन आदरांजली वाहिली.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:Sushma Swaraj Death MDH owner Mahashay Dharampal Gulati gets emotional after paying tribute