पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

सुषमा स्वराज यांच्या निधनामुळे धक्का, राहुल गांधी यांची श्रद्धांजली

राहुल गांधी

भाजपच्या ज्येष्ठ नेत्या आणि माजी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांच्या जाण्यामुळे आपल्याला धक्का बसल्याचे काँग्रेसचे मावळते अध्यक्ष राहुल गांधी यांनी म्हटले आहे. सुषमा स्वराज यांचे मंगळवारी रात्री नवी दिल्लीतील एम्स रुग्णालयात निधन झाले. त्यांच्या निधनामुळे संपूर्ण देशभरात शोक व्यक्त करण्यात येत आहे. 

भारतीय राजकारणातील एका अध्यायाचा अंत - नरेंद्र मोदी

राहुल गांधी यांनी ट्विटरच्या माध्यमातून सुषमा स्वराज यांना श्रद्धांजली अर्पण केली. आपल्या ट्विटमध्ये ते लिहितात, सुषमा स्वराज एक असामान्य राजकीय नेत्या आणि संसदपटू होत्या. त्यांना ओजस्वी वक्तृत्त्वाचे वरदान लाभले होते. सर्व पक्षातील नेत्यांशी त्यांचे चांगले संबंध होते. त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात मी सहभागी आहे. 

छातीत दुखू लागल्यामुळे सुषमा स्वराज यांना मंगळवारी रात्री एम्समध्ये दाखल करण्यात आले. पण ह्रदयविकाराचा झटका आल्यामुळे त्यांचे रुग्णालयातच निधन झाले.