पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

सर्वेः चार वर्षांत ग्रामीण युवकांच्या बेरोजगारीत तीन पटींनी वाढ

बेरोजगारी

केंद्रीय सांख्यिकी मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार गत सहा वर्षांत ग्रामीण क्षेत्रातील युवकांच्या बेरोजगारीच्या दरात तीन पटींहून अधिक वाढ झाली आहे. २००४-०५ शी तुलना केल्यास यात चारपट वाढ झाली आहे. 

आतापर्यंत ग्रामीण क्षेत्रातील बेरोजगारीचा दर हा शहरांच्या तुलनेत कमी असत. कारण मोठ्या संख्येने युवक कृषी किंवा त्या क्षेत्राशी निगडीत लघु उद्योगात काम करत असत. पण आता गावांमधील स्थितीही शहरांसारखी झाली आहे. मंत्रालयाकडून नुकताच जारी करण्यात आलेल्या अहवालानुसार १५-२९ वर्षांच्या युवकांमध्ये बेरोजगारीचे वेगळे आकडे एकत्र करण्यात आले आहेत. त्यानुसार २०११-१२ मध्ये १५ ते २९ वर्गातील युवकांमध्ये बेरोजगारीचा दर ५ टक्के होता. जो २०१७-१८ मध्ये वाढून १७.४ टक्के झाला. हा शहरी क्षेत्रातील युवकांच्या बेरोजगारीच्या दरापेक्षा अवघ्या १ टक्क्यांनी कमी आहे. 

या क्षेत्रातील माहितगारांनी सांगितले की, ग्रामीण क्षेत्रातील बेरोजगारी वेगाने वाढण्यामागे दोन कारणे आहेत. प्रथम, शिक्षणाचा स्तर वाढल्यामुळे कृषी कामात युवकांचा हिस्सा घटला आहे. तर दुसरे, कृषी क्षेत्राशी निगडीत छोटे-मोठे ग्रामीण कामे बंद होत आहेत. 

युवकांमधील बेरोजगारी


वर्ष            ग्रामीण युवक/युवती            शहरी युवक/युवती

२००५-०६        ३.९/४.२                            ८.८-१४.९

२००९-१०        ४.७/४.६                            ७.५/१४.३

२०११-१२        ५.०/४.८                            ८.१/१३.१

२०१७-१८        १७.४/१३.६                        १८.७/२७.२