पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

कलम ३७० च्या विधेयकावर मतदानच केले नाही, शहा खोटं बोलले: सुप्रिया सुळे

खासदार सुप्रिया सुळे

जम्मू काश्मीरमधील कलम ३७० च्या संदर्भात खोटी माहिती पसरवून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा जनतेची दिशाभूल करत आहेत, असे राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे. सोलापूर येथील भाजपच्या जनादेश यात्रेच्या दुसऱ्या टप्प्यातील समारोहाच्या कार्यक्रमात अमित शहा यांनी कलम ३७० चा मुद्दा उपस्थित करत सुप्रिया सुळे यांनी सरकारने घेतलेल्या ऐतिहासिक निर्णयाच्या विरोधात मतदान केल्याचे म्हटले होते. 

जम्मू-काश्मीरमधून कलम ३७० हटवल्याल्याचा दाखला देताना शहा यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर निशाणा साधला होता. यावेळी त्यांनी खासदार सुप्रिया सुळे यांनी कलम ३७० च्या विरोधात मतदान केल्याचे सांगितले. त्यांचे हे विधान खोटं असल्याचे सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे.  

कलम ३७० च्या विधेयकावर मी मतदानच केलेले नाही. तुम्ही संसदेच्या रेकॉर्ड तपासू शकता, देशाचे गृहमंत्री धांदात खोट बोलत आहेत, अशी टीका सुप्रिया सुळे यांनी ट्विटच्या माध्यमातून केली आहे. कलम ३७० संदर्भात खोटे बोलून अमित शहा देशाची दिशाभूल करत आहेत, असा उल्लेखही त्यांनी ट्विटमध्ये केला आहे.

सोलापुरच्या व्यासपीठावरुन अमित शहांनी दिले शरद पवारांना आव्हान

संपूर्ण देश कलम ३७० हटवण्याच्या मोदी सरकारने घेतलेल्या निर्णयाच्या बाजूने आहे. पण काँग्रेस आणि राष्ट्रवादी याला विरोध करत आहेत. काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यासह शरद पवारांनी राज्यातील निवडणुकांपूर्वी कलम ३७० संदर्भातील आपली भूमिका स्पष्ट करावी, असे शहा म्हणाले होते.