पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

सुप्रिया सुळेंनी लोकसभेत मांडली डोंबिवलीच्या रेल्वे प्रवाशांची व्यथा

खासदार सुप्रिया सुळे

राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी मंगळवारी लोकसभेमध्ये डोंबिवलीमधील लोकलच्या गर्दीचा मुद्दा उपस्थित केला. लोकलमधील गर्दीमुळे डोंबिवलीकरांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. त्यामुळे डोंबिवलीत लोकलच्या फेऱ्या वाढवण्यात याव्या अशी मागणी सुप्रिया सुळेंनी केली.

देशाच्या अर्थव्यवस्थेला आता देवच वाचवेल, चिदंबरम यांची टीका

डोंबिवलीमध्ये सकाळी आणि संध्याकाळी या दोन्ही वेळेमध्ये मोठ्या प्रमाणावर गर्दी असते. कल्याण आणि बदलापूरवरुन लोकल आल्यामुळे त्यामध्ये आधीच गर्दी असते. लोकलमध्ये गर्दी असल्यामुळे अनेकांना लोकलमध्ये चढता येत नाही तसंच कामावर जाण्यास उशिर होतो. यामुळे डोंबिवली स्थानकावर लोकलच्या फेऱ्या वाढण्यात याव्या अशी मागणी वारंवार करण्यात येत आहे. आज हा मुद्दा सुप्रिया सुळे यांनी लोकसभेमध्ये उचलून धरला. 

सलमान खान विरोधातील ते सर्व खटले सुप्रीम कोर्टाकडून रद्द

सुप्रिया सुळे यांनी डोंबिवली लोकलमध्ये जास्त गर्दी आणि लोकलमध्ये वेळेचा अभाव असल्याचा मुद्दा उपस्थित केला. सुप्रिया सुळेंनी निकषात नियम ३७७ च्या अंतर्गत तातडीच्या सार्वजनिक महत्त्वाच्या बाबींनुसार हा मुद्दा उपस्थित केला.  डोंबिवली स्थानकावर लोकलच्या फेऱ्या  वाढविण्यात याव्या अशी मागणी त्यांनी केंद्र सरकारकडे केली आहे. 

जेव्हा नासाने मानली हार तेव्हा चेन्नईच्या इंजिनिअरने शोधला 'विक्रम'

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:supriya sule raised the issue of over crowding on the dombivali local train and lack of punctuality on the trains