पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

अयोध्या ऐतिहासिक निकाल! कोण काय म्हणाले...

या नेत्यांनी अयोध्या प्रकरणाच्या ऐतिहासिक निकालवर प्रतिक्रिया दिल्या आहेत.

अयोध्येतील वादग्रस्त जागा ही रामलल्लाची असल्याचा ऐतिहासिक निकाल सर्वाच्च न्यायालयाने दिला. या निकालानंतर अनेक प्रतिक्रिया उमटण्यास सुरुवात झाली आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि केंद्रीय संरक्षणमत्री राजनाथ सिंह यांनी न्यायालयाच्या निकालाचे स्वागत केले आहे. न्यायालयाने दिलेला निकाल हा संयमी आणि संतुलित असून जनतेने याचे शांती आणि सौहार्दपूर्णरित्या स्वागत करायला हवे, असे आवाहन गडकरी यांनी केले आहे. 

माजी लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन यांनीही हा निकाल संतुलित आणि संयमी असल्याचे म्हटले आहे. घरामध्ये दीप प्रज्वलित करुन शांततेमध्ये आनंद साजरा करा, असे त्या म्हणाल्या आहेत. मुस्लीम पक्षाचे एक पक्षकार इक्बाल अन्सारी यांनी देखील न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत केले. न्यायालयाच्या निकालामुळे देशातील सर्वधर्मभाव ही भावना अधिक मजबूत होण्यास मदत होईल, असा विश्वास राजनाथ सिंह यांनी व्यक्त केला आहे.  

राम मंदिर हे १२ व्या शतकातील असून हिंदूंचा दावा खोटा नसल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले. तसेच मुस्लिमांना मशीद उभारण्यासाठी ५ एकर पर्यायी जागा देण्याचे आदेश दिले. त्याचप्रमाणे ट्रस्ट स्थापन करुन राम मंदिर उभारण्याचे आदेश देत केंद्र सरकारने ३ महिन्यांत योजना आखण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहे. सर्वोच्च न्यायालयाने एकमताने हा निर्णय दिला आहे.  

काँग्रसचे प्रवक्ता रणदीप सुरजेवाला यांनी पत्रकार परिषद घेऊन काँग्रेसची भूमिका मांडली. न्यायालयाच्या निकालाचे स्वागत करताना ते म्हणाले की, सर्वोच्च न्यायालयाच्या या निकालामुळे धर्माच्या नावावर राजकारण करण्याचे दरवाजे बंद झाले आहेत.

सर्वोच्च न्यायालयाने दिलेली ऐतिहासिक निकाल देशाची एकता, अखंडता आणि महान संस्कृतीला बळ देणारा ठरेल, असा विश्वास केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी व्यक्त केला आहे. सर्व समुहाच्या आणि धर्माच्या लोकांनी या निर्णयाचे शांततापूर्ण आणि सौहार्दपूर्णरित्या स्वागत करावे, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:supreme court verdict Ram Janmabhoomi Babri Masjid ayodhya case reaction of bjp congress and other party leaders