पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

आधार 'सोशल'ला जोडण्याची सर्व प्रकरणे सुप्रीम कोर्टात

आधार 'सोशल'ला जोडण्याची सर्व प्रकरणे सुप्रीम कोर्टात

सोशल मीडिया प्रोफाईल आणि आधार डेटाबेसला इंटरलिंक करण्यासंबंधीच्या विविध उच्च न्यायालयात प्रलंबित असलेल्या याचिकेवर आता सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने सर्व प्रलंबित प्रकरणे उच्च न्यायालयात हस्तांतरित केले आहेत. सर्वोच्च न्यायालयात याप्रकरणी आता जानेवारीत सुनावणी होईल. 

पीएमसी बँकेच्या खातेधारकांचे आझाद मैदानावर आंदोलन

तर या प्रकरणाच्या सुनावणी दरम्यान सर्वोच्च न्यायालयाने सांगितले की, सरकार नागरिकांच्या गोपनीयतेवर अतिक्रमण करण्यासाठी नाही. पण गोपनीयता राष्ट्रीय हित आणि सार्वभौमत्वासह संतुलित असले पाहिजे. सरकारची बाजू मांडणारे सॉलिसटर जनरल तुषार मेहता न्यायालयात म्हणाले की, कोणताही मध्यस्थ गोपनीयतेच्या आड दहशतवादी हालचालींना संरक्षण देता येईल, असे म्हणू शकत नाही. 

तामिळनाडूकडून उपस्थित राहिलेले अटर्नी जनरल के के वेणुगोपाल यांनी उच्च न्यायालयात प्रलंबित सर्व प्रकरणे सर्वोच्च न्यायालयात हस्तांतरित करण्यासंबंधीच्या फेसबुकच्या याचिकेचा विरोध केला. 

नोबेले विजेते अभिजित बॅनर्जींना भेटल्यावर नरेंद्र मोदी म्हणतात...

दरम्यान, मागील महिन्यात सर्वोच्च न्यायालयाने म्हटले होते की, सोशल मीडिया प्रोफाईलला आधार कार्ड जो़डण्यासंबंधी लवकर निर्णय घेण्याची आवश्यकता आहे. न्या दीपक गुप्ता आणि अनिरुद्ध बोस यांच्या खंडपीठाने म्हटले होते की, यावेळी आम्हाला माहीत नाही की, याबाबत आम्ही निर्णय घेऊ शकतो की उच्च न्यायालय. खंडपीठ याप्रकरणात गुणवत्तेचा विचार करणार नाही.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:Supreme Court transfers to itself all cases related to linkage of social media profiles with Aadhaar pending in different high courts