पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

निर्भया प्रकरणात आता सुप्रीम कोर्टात मंगळवारी सुनावणी

दिल्ली सामूहिक बलात्कार प्रकरणातील दोषी

निर्भया सामूहिक बलात्कार प्रकरणातील दोषींना देण्यात आलेल्या फाशीची तातडीने अंमबजावणी करण्यासंदर्भात केंद्र आणि दिल्ली सरकारने सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवर आता पुढील आठवड्यात मंगळवारी सुनावणी होईल. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश आर. बानुमथी यांच्या नेतृत्त्वाखालील तीन सदस्यीय खंडपीठापुढे ही सुनावणी झाली. त्यावेळी न्यायालयाने मंगळवारी सुनावणी घेण्याचे निश्चित केले.

वांद्र्यातील घुसखोरांचे मोहल्ले आधी साफ करा, मनसेची पोस्टरबाजी

चारही दोषींविरोधात डेथ वॉरंट जारी करावे, अशी मागणी केंद्र सरकारचे महाधिवक्ता तुषार मेहता यांनी केली. दोषींकडून केवळ शिक्षेची अंमलबजावणी पुढे ढकलण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. हेच दोषी काही दिवसांनी पुन्हा न्यायालयात येतील आणि फाशीच्या अंमलबजावणीला उशीर झाल्यामुळे आपली फाशी रद्द करून जन्मठेप देण्यात यावी, अशी मागणी करतील, याकडे तुषार मेहता यांनी न्यायालयाचे लक्ष वेधले. 

शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना ७०० कोटींचे अतिरिक्त वाटप, हायकोर्टात माहिती

थोडावेळ या प्रकरणी सुनावणी झाल्यानंतर न्यायालयाने पुढील आठवड्यापर्यंत थांबण्याचा निर्णय घेतला. मंगळवारी, ११ फेब्रुवारीला पुढील सुनावणी होणार आहे.
या प्रकरणात चारही दोषींना गेल्या शनिवारी, १ फेब्रुवारीला फाशी देण्यात येणार होती. पण आदल्या दिवशी दिल्लीतील न्यायालयाने पुढील आदेशापर्यंत फाशीच्या शिक्षेला स्थगिती दिली.