पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

हैदराबाद एन्काऊंटरविरोधात दाखल याचिकांवर सुप्रीम कोर्टात बुधवारी सुनावणी

सर्वोच्च न्यायालय

हैदराबादमधील बलात्कार आणि पीडितेची जाळून हत्या करण्याच्या प्रकरणातील चारही आरोपींचे शुक्रवारी सकाळी तेलंगणा पोलिसांनी एन्काऊंटर केले होते. यामध्ये चारही आरोपी मृत पावले. या एन्काऊंटर विरोधात दाखल झालेल्या याचिकांवर सर्वोच्च न्यायालयात बुधवारी, ११ डिसेंबर रोजी सुनावणी होणार आहे. 

अमित शहा लोकसभेत मांडणार नागरिकत्व दुरुस्ती विधेयक

तेलंगणात आरोपींचे एन्काऊंटर करणाऱ्या पोलिसांविरोधात गुन्हा दाखल केला जावा. या प्रकरणाचा सखोल तपास केला जावा आणि आरोपी पोलिसांवर कडक कारवाई केली जावी, अशी मागणी याचिकाकर्त्यांनी केली आहे. या प्रकरणी दाखल सर्व याचिकांवर ११ डिसेंबर रोजी सुनावणी घेण्याचे निश्चित करण्यात आले आहे.

... अखेर राज्यातील मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहूर्त ठरला!

हैदराबादमध्ये पशुवैद्यकीय डॉक्टरवर अमानूषपणे सामूहिक बलात्कार करून नंतर तिची जाळून हत्या करण्यात आली होती. गेल्या महिन्याच्या अखेरिस ही घटना घडली. या प्रकरणी तेलंगणा पोलिसांनी तातडीने कारवाई करून चारही आरोपींना अटक केली. या आरोपींना शुक्रवारी सकाळी घटनास्थळी नेण्यात आले होते. घटना नेमकी कशी घडली हे जाणून घेण्यासाठी आरोपींना तिथे नेण्यात आले, असे पोलिसांनी सांगितले. पण घटनास्थळी दोन आरोपींनी पोलिसांकडून शस्त्रे हिसकावली आणि त्यांच्यावर हल्ला चढवला. यानंतर आरोपी पळून जाण्याच्या प्रयत्नात असताना पोलिसांनी केलेल्या गोळीबारात चारही जण मृत पावले होते. या एन्काऊंटरचे काही जणांनी स्वागत केले होते. पण काहींनी अशा पद्धतीने आरोपींना मारून टाकणे योग्य नसल्याचे म्हटले होते. आरोपींना न्यायालयाने शिक्षा ठोठावणेच योग्य असल्याचे त्यांचे म्हणणे होते.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:Supreme Court to hear on December 11 a petition seeking registration of FIR investigation in encounter of four accused in rape