पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

अयोध्या प्रकरणी सुप्रीम कोर्ट शनिवारी सकाळी देणार निकाल

अयोध्या निकालादिवशी १८३ जण राहणार नजरकैदेत

देशातील सर्वांत जुन्या अयोध्या प्रकरणावर शनिवारी सर्वोच्च न्यायालय निकाल देणार आहे. या निकालाच्या पार्श्वभूमीवर देशभरातील सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे. सरकारसह धर्मगुरुंनीही शांतता राखण्याचे आवाहन केले आहे. शनिवारी सकाळी साडेदहा वाजता निकाल वाचनास सुरुवात होईल. दि. ६ ऑगस्टपासून सुमारे ४० दिवस यावर दररोज सुनावणी सुरु होती. 'एएनआय'ने याबाबतचे वृत्त दिले आहे.

भारतातील सर्वांत संवेदनशील, धार्मिक आणि राजकीय मुद्द्यांपैकी एक राम जन्मभूमी-बाबरी मशीद वादावर भारताचे सरन्यायाधीश रंजन गोगोईंच्या नेतृत्वाखाली सर्वोच्च न्यायालयाचे खंडपीठ शनिवारी निकाल देईन. 


अयोध्या जमीन वादाप्रकरणी सुनावणी करणाऱ्या खंडपीठात सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्याशिवाय ४ इतर न्यायाधीश- न्या. शरद बोबडे, न्या. अशोक भूषण, न्या. डी वाय चंद्रचूड आणि न्या एस अब्दुल नझीर.

दि. ४ ऑक्टोबर रोजी घटनापीठाने अयोध्या प्रकरणी १७ ऑक्टोबरपर्यंत सुनावणी पूर्ण होईल व १७ नोव्हेंबरपर्यंत निकाल दिला जाईल, असे न्यायालयाने स्पष्ट केले होते. त्यानुसार १६ ऑक्टोबर रोजी अयोध्या खटल्याची सुनावणी पूर्ण करत घटनापीठाने या खटल्याचा निकाल राखून ठेवला होता.