पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

आरे वृक्षतोड प्रकरण SC ने घेतले मनावर, आज होणार सुनावणी

सर्वोच्च न्यायालय

आरे कॉलनीतील वृक्ष तोडीप्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने स्वत: हस्तक्षेप केला आहे. आरे प्रकरणात विद्यार्थी शिष्टमंडळाने सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश रंजन गोगई यांना पत्र लिहले होते. त्यानंतर सर्वोच्च न्यायालय सोमवारी विशेष खंडीपीठात या प्रकरणाची सुनावणी करणार आहे. यापूर्वी आरे कॉलनीतील वृक्ष तोडीप्रकरणी तात्काळ हस्तक्षेप करावा यासाठी दाखल केलेली याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळली होती. 

आरे वृक्षतोडीच्या विरोधात 'वंचित'ची उडी, प्रकाश आंबेडकर यांना अटक

मेट्रो कारशेडसाठी सुमारे २ हजार ६०० झाडे तोडावी लागणार आहेत. यापार्श्वभूमीवर शुक्रवारी रात्रीच्या अंधारात झाडांची कत्तल सुरू करण्यात आली. रात्रभरात १ हजारो झाडे इलेक्ट्रिक कटरच्या साह्याने कापण्यात आली. स्थानिक नागरिक, आदिवासी बांधव तसेच पर्यावरण प्रेमींनी या वृक्षतोडीला कडाडून विरोध केला. वृक्षतोडीची माहिती मिळताच हजारो नागरिक याठिकाणी जमा झाले होते.  

आरेतील वृक्षतोडीच्या मुद्द्यावरुन प्रशासन आणि पर्यावरण प्रेमी आमने-सामने आल्याचे पाहायला मिळाले. आरे वाचवा मोहिमेअंतर्गत आंदोलन करणाऱ्या ३८ जणांना पोलिसांनी शनिवारी अटक केली होती. या सर्वांना रविवारी बोरिवलीच्या न्यायालयात हजर केले होते. त्यापैकी २९ जणांना न्यायालयाने आज जामीन मंजूर केला होता.

'आरे वाचवा' मोहिमेतील २९ जणांना जामीन