पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

बाबरी मशीद प्रकरणी ९ महिन्यांत निकाल द्या-सर्वोच्च न्यायालय

सर्वोच्च न्यायालय

बाबरी मशीद खटल्याचा निकाल ९ महिन्यांच्या आत द्या, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने या खटल्याची सुनावणी करणाऱ्या विशेष न्यायाधीशांना दिले आहेत. या प्रकरणात भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी आणि मुरलीमनोहर जोशी यांच्यासह भाजपच्या अनेक नेत्यांच्या नावांचा समावेश आहे. सर्वोच्च न्यायालयाने आज (शुक्रवार) स्पष्ट केले आहे की, या प्रकरणाची सुनावणी आणि निर्णय ९ महिन्याच्या आत व्हायला हवी. हा ९ महिन्यांचा कालावधी आजपासून (दि.१० जुलै) गृहीत धरला आहे. त्याचबरोबर सप्टेंबरमध्ये निवृत्त होत असलेल्या न्यायाधीशांचा कार्यकाळ वाढवण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.

बाबरी मशीद प्रकरणाची सुनावणी लखनऊ येथील सीबीआय न्यायालयाचे न्यायमुर्ती एस के यादव यांच्याकडे सुरु आहे. न्या. यादव हे ३० सप्टेंबर २०१९ रोजी निवृत्त होत आहेत. त्यांनी यापूर्वीच सर्वोच्च न्यायालयात अर्ज करुन बाबरी मशीद खटल्याची सुनावणी करण्यासाठी अतिरिक्त वेळ आवश्यक असल्याचे म्हटले होते. यावर सर्वोच्च न्यायालयाने त्यांना ९ महिन्यांच्या आत यावरील सुनावणी पूर्ण करुन निर्णय देण्यास सांगितले. त्याचबरोबर याप्रकरणाच्या सुनावणीत पुराव्यांचे रेकॉर्डिंग ६ महिन्याच्या आत पूर्ण करण्यासही सांगितले आहे. 

अयोध्याप्रकरणी मध्यस्थ समितीला अहवाल सादर करण्यास मुदतवाढ

या प्रकरणाची सुनावणी करत असलेले आणि ३० सप्टेंबर रोजी निवृत्त होत असलेल्या विशेष न्यायाधीशांचा कार्यकाळ सुनावणी पूर्ण होईपर्यंत वाढवण्याचे निर्देश दिले आहेत. या प्रकरणाच्या सुनावणीसाठी यापूर्वी एप्रिल २०१९ पर्यंत मुदत देण्यात आली होती. परंतु, न्यायाधीशांनी ६ महिन्यांचा अतिरिक्त कालावधी मागितला होता. या प्रकरणात अडवाणी, जोशी यांच्यासह उमा भारती यांच्या नावाचाही समावेश आहे.

अयोध्या दहशतवादी हल्ल्याप्रकरणात चौघांना जन्मठेप, एकाची निर्दोष सुटका