पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

भारतरत्न पुरस्कारापेक्षा महात्मा गांधी मोठे, सुप्रीम कोर्टाने जनहित याचिका फेटाळली

सर्वोच्च न्यायालय

महात्मा गांधी यांना भारतरत्न पुरस्कर देण्याची मागणी करणारी जनहित याचिका (पीआयएल) सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली आहे. महात्मा गांधी हे भारतरत्नपेक्षा मोठे आहेत, असे मत सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांनी व्यक्त केले आहे. 

मुंबईत जानेवारीत सर्वाधिक थंडी, दशकातील नवा विक्रम

सर्वोच्च न्यायालयाने सुनावणी करताना जनहित याचिका दाखल करणाऱ्यांना केंद्र सरकारला याबाबत लिहिण्यास सांगितले आहे. सरन्यायाधीशांनी म्हटले की, महात्मा गांधींना कोणत्याही औपचारिक मान्यतेची आवश्यकता नाही. ते राष्ट्रपिता आहेत. ते अशाप्रकारच्या मान्यतांपासून वरच्या स्तरावर आहेत. लोक त्यांच्याकडे सन्मानाच्या नजरेतून पाहतात. 

जीसॅट-३० उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; इंटरनेट स्पीड वाढणार

महात्मा गांधींना भारतरत्न देण्याच्या मागणीवरुन अनेकवेळा जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. महात्मा गांधींना भारतरत्न देणे म्हणजे त्यांचे योगदानाला कमी लेखणे असेल असे म्हणत प्रत्येकवेळी सर्वोच्च न्यायालयाने ही याचिका फेटाळली आहे.

मुलीच्या लग्नाची चिंता; पुण्यात डीएसके ठेवीदाराची आत्महत्या