पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

सीबीआय म्हणजे देव नाही, सुप्रीम कोर्टाने खडसावले

सर्वोच्च न्यायालय

केंद्रीय अन्वेषण विभाग अर्थात सीबीआय म्हणजे काही देव नाही की तपासाची सर्व प्रकरणे त्याच्याकडे सोपविली जायला हवीत, असे निरीक्षण सर्वोच्च न्यायालयाने नोंदविले आहे. त्याचवेळी न्यायालयाने पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाचा एक निर्णय रद्दबातल ठरविला. राज्यातील एक व्यक्ती गायब झाल्याचा तपास स्थानिक पोलिसांकडून काढून घेऊन सीबीआयकडे देण्यात आला होता. उच्च न्यायालयाचा हा निकाल सर्वोच्च न्यायालयाने रद्द ठरविला.

ईडी, सीबीआय हे भाजपच्या विजयाचे मजबूत आधारस्तंभः संजय राऊत

न्या. एन व्ही रमना आणि न्या. संजीव खन्ना यांच्या खंडपीठाने या प्रकरणी निकाल देताना सांगितले की, सीबीआय म्हणजे काही देव नाही की त्यांना सगळ्या गोष्टी माहिती असतात आणि ते सगळ्या प्रकारच्या गुन्ह्यांची उकल करू शकतात. प्रत्येक प्रकरणाचा तपास जर सीबीआयकडे देऊ लागलो तर अराजकता निर्माण होईल आणि ही तपास संस्था आपले काम व्यवस्थितपणे करू शकणार नाही.

BLOG: शेती, पर्यावरण आणि समाजाची भूमिका

हरियाणातील पलवलमधून गायब झालेल्या एका व्यक्तीचा शोध घेण्याचे प्रकरण २०१७ मध्ये पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाने सीबीआयकडे देण्याचा निर्णय दिला होता. २०१२ पासून आपला भाऊ गायब असल्याचे याचिकाकर्त्याचे म्हणणे होते. आमच्या वडिलांकडून ज्यांनी जमीन खरीद केली होती. त्यांच्याकडून पैसे आणण्यासाठी माझा भाऊ गेला होता. तेव्हापासून तो गायबच आहे. हे संपूर्ण प्रकरण उच्च न्यायालयाने सीबीआयकडे सोपविले होते.