पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

निर्भया प्रकरणः 'दोषी विनय मानसिकदृष्ट्या तंदुरुस्त', सुप्रीम कोर्टाने याचिका फेटाळली

विनय शर्मा

निर्भया सामूहिक बलात्कार आणि खून प्रकरणातील दोषी विनय शर्माचा आणखी एक प्रयत्न अपयशी ठरला आहे. राष्ट्रपतींच्या दया याचिका फेटाळण्याच्या प्रक्रियेवर प्रश्न उपस्थित करत विनयने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. ही याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली आहे. स्वतःला मनोरुग्ण सांगत फाशी टाळण्याची त्याने मागणी केली होती. सर्वोच्च न्यायालयाने विनय मानसिकदृष्ट्या तंदुरुस्त असल्याचे सांगितले. न्यायालयाने सुनावणीनंतर निर्णय सुरक्षित ठेवला होता. 

'भीमा-कोरेगावचा तपास एनआयएकडे देण्याचा राज्य सरकारचा निर्णय चुकीचा'

न्या. अशोक भूषण आणि ए एस बोपण्णा यांच्यासह न्या. आर भानुमती यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने हा निर्णय घेतला आहे. सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी निर्भया प्रकरणातील चार दोषींपैकी एक विनय शर्माच्या याचिकेवरील निर्णय सुरक्षित ठेवला होता. ज्यामध्ये त्याने राष्ट्रपतींकडून त्याच्या दया याचिकेच्या अस्वीकृतीस आव्हान दिले होते. 

भीमा-कोरेगाव प्रकरणः हायकोर्टाने नवलखा, तेलतुंबडेंचा जामीन अर्ज

सर्वोच्च न्यायालयात दोषी विनय शर्माचे प्रतिनिधीत्व करणारे वकील ए पी सिंह यांनी आपल्या पक्षकाराची दया याचिका फेटाळण्याच्या राष्ट्रपतींच्या निर्णयावर प्रश्न उपस्थित केला होता. यावर न्यायालयात सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी टीका केली होती. तुषार मेहता हे या प्रकरणात केंद्राची बाजू मांडत आहेत.

ए पी सिंह यांनी दोषी विनयची मानसिक स्थितीसंबंधी युक्तिवाद केला. त्यामध्ये विनय हा मानसिकरित्या आजारी आहे. त्याच्यावर उपचार सुरु आहेत, असा दावा केला होता.