पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

निर्भया बलात्कार प्रकरणातील दोषी पवन गुप्ताची याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली

पवनकुमार गुप्ता

दिल्लीतील निर्भया बलात्कार प्रकरणातील एक दोषी पवन गुप्ता याची निर्णयसुधार याचिका (क्युरिटिव्ह पिटिशन) सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी फेटाळली. पवन गुप्तासह चौघांना या प्रकरणात न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली आहे. आपली फाशीची शिक्षा जन्मठेपेमध्ये रुपांतरित करण्यात यावी, अशी मागणी पवन गुप्ता याने निर्णयसुधार याचिकेद्वारा केली होती. पण न्यायालयाने त्याची याचिका फेटाळली.

दिल्ली हिंसाचाराचे ४६ बळी, नाल्यात मिळाले आणखी ४ मृतदेह

या प्रकरणात चारही दोषी विनय शर्मा, मुकेशकुमार सिंह, पवन गुप्ता आणि अक्षय ठाकूर यांना मंगळवारी, ३ मार्च रोजी सकाळी सहा वाजता तिहार तुरुंगात फाशी देण्यात येणार आहे. या चौघांचेही डेथ वॉरंट जारी करण्यात आले आहे. त्या पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी दिलेल्या निकालाला महत्त्व प्राप्त झाले आहे.

दिल्लीत २०१२ मध्ये ज्या दिवशी ही घटना घडली. त्यावेळी आपले वय १६ वर्षे आणि दोन महिने इतके होते. पण या प्रकरणी निकाल देताना न्यायालयाने अल्पवयीनांसाठीच्या कायद्यातील तरतुदींचा विचार केलेला नाही, असा युक्तिवाद पवन गुप्ता याच्या वकिलांनी न्यायालयात केला. पण न्यायालयाने त्यांचा युक्तिवाद फेटाळला. 

कलम ३७० रद्द करण्याविरोधात दाखल याचिकांवर सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय

या प्रकरणी चारही दोषींना फाशी देण्यासाठी याआधी दोन वेळा डेथ वॉरंट जारी करण्यात आले होते. पण ऐनवेळी चारही दोषींच्या फाशीची अंमलबजावणी पुढे ढकलण्यात आली होती.