पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

राज्यसभा पोटनिवडणूक : गुजरातमधील काँग्रेस नेत्यांची याचिका फेटाळली

सर्वोच्च न्यायालय

गुजरातमधील राज्यसभेच्या दोन जागांसाठी एकत्रित पोटनिवडणूक घेण्याची मागणी करणारी काँग्रेस नेत्यांची याचिका मंगळवारी सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली. या दोन जागांसाठी केंद्रीय निवडणूक आयोगाने अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. एकदा आयोगाने अधिसूचना प्रसिद्ध केल्यानंतर न्यायालय त्यामध्ये हस्तक्षेप करू शकत नाही, असे सांगत न्यायालयाने याचिका फेटाळली.

परराष्ट्र मंत्री जयशंकर गुजरातमधून राज्यसभेची उमेदवारी

गुजरातमधील विधानसभेतील विरोधी पक्षनेते आणि अमरेलीतील काँग्रेसचे आमदार परेशभाई धनानी यांनी ही याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल केली होती. गुजरातमधील राज्यसभेच्या दोन जागांसाठीची पोटनिवडणूक एकत्रितपणे घेण्यासाठी निवडणूक आयोगाला निर्देश द्यावेत, अशी मागणी त्यांनी केली होती. जर दोन्ही जागांसाठी एकत्रित निवडणूक झाली तर दोनपैकी एका जागेवर काँग्रेसचा उमेदवार विजयी होऊ शकतो. या पार्श्वभूमीवर ही याचिका दाखल करण्यात आली होती. 
गुजरात विधानसभेच्या १८२ जागांपैकी ७१ जागांवर काँग्रेसचे उमेदवार विजयी झाले आहेत. तर भाजपकडे १०४ इतके संख्याबळ आहे. विधानसभेतील सात जागा सध्या रिक्त आहेत.

पोटनिवडणुकीसाठी दोन स्वतंत्र अधिसूचना प्रसिद्ध करण्याचा निवडणूक आयोगाचा निर्णय दबावाखाली घेतला जातो आहे, असा आरोप काँग्रेसने केला आहे. 
दरम्यान, गुजरातमधील पोटनिवडणुकीच्या कार्यक्रमात सर्वोच्च न्यायालय हस्तक्षेप करू शकत नाही, असे निवडणूक आयोगाने आपल्या युक्तिवादात म्हटले आहे. एकदा पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यावर सर्वोच्च न्यायालय त्यामध्ये हस्तक्षेप करू शकत नाही, असे आयोगाने स्पष्ट केले आहे. 

स्विस बँकेत भारतीयांचे ७००० कोटी रुपये

गुजरातमधून राज्यसभेवर गेलेले केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि केंद्रीय महिला व बालकल्याण मंत्री स्मृती इराणी हे दोघेही लोकसभा निवडणुकीत अनुक्रमे गांधीनगर आणि अमेठी या मतदारसंघातून निवडून आले आहेत. त्यामुळे येथून राज्यसभेची पोटनिवडणूक होते आहे.

भाजपने परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांना गुजरातमधून राज्यसभेसाठी उमेदवारी जाहीर केली आहे.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:Supreme Court refuses to interfere with EC notification on separate Rajya Sabha bypolls on 2 Gujarat seats