पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

शबरीमला मंदिरात महिलांना प्रवेशाचे प्रकरण आता घटनापीठाकडे

सर्वोच्च न्यायालय

शबरीमला अय्यपा मंदिरात १० ते ५० वयोगटातील महिलांना प्रवेश देण्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात दाखल झालेल्या सर्व फेरविचार याचिका ७ न्यायाधीशांच्या घटनापीठाकडे सोपविण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी घेतला. ६ फेब्रुवारीला या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने आपला निकाल राखून ठेवला होता. 

त्या दोन घटनांमुळे राष्ट्रवादीच्या हेतूंबद्दल काँग्रेस साशंक

सर्वोच्च न्यायालयाने २८ सप्टेंबर २०१८ रोजी दिलेल्या मूळ निकालात सर्व वयोगटातील महिलांना शबरीमला अयप्पा मंदिरात प्रवेश देण्याचा निर्णय दिला होता. पण त्याला मोठ्या प्रमाणात विरोध झाला. यावरून केरळमध्ये मोठे आंदोलनही उभे राहिले होते. त्यानंतर ५६ फेरविचार याचिका या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आल्या होत्या.

सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या नेतृत्त्वाखाली पाच सदस्यीय खंडपीठाने या प्रकरणी ३:२ निकाल दिला. रंजन गोगोई, न्या. इंदू मल्होत्रा आणि न्या. ए एम खानविलकर यांनी हे प्रकरण सात सदस्यांच्या घटनापीठाकडे सोपविण्याच्या बाजूने आपले मत नोंदविले. तर न्या. धनंजय चंद्रचूड आणि न्या. आर एफ नरिमन यांनी या सर्व फेरविचार याचिका फेटाळण्यात याव्यात, असे मत नोंदविले. ३ विरुद्ध २ असे पद्धतीने निकाल देण्यात आल्यामुळे हे प्रकरण आता सात न्यायाधीशांच्या घटनापीठाकडे सोपविण्यात येणार आहे.

'भाजपपेक्षा शिवसैनिकांना नरेंद्र मोदींचा जास्त आदर आणि म्हणूनच...'

शबरीमला मंदिरात १० ते ५० वयोगटातील म्हणजेच मासिक पाळी येणाऱ्या महिलांना प्रवेश बंदी आहे. ती सर्वोच्च न्यायालयाच्या मूळ निकालाने उठविण्यात आली होती. त्यानंतर या प्रकरणी ५६ फेरविचार याचिका, चार नव्या याचिका आणि पाच हस्तांतर याचिका दाखल झाल्या होत्या. रुढी, परंपरेनुसार या मंदिरात १० ते ५० वयोगटातील महिलांना प्रवेश बंदी आहे.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:Supreme Court refers to larger bench the review petitions against the verdict allowing entry of women in the Sabarimala Temple