पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

हैदराबाद एन्काऊंटर: माजी न्यायाधीशांमार्फत होणार चौकशी

हैदराबाद एन्काऊंटर

हैदराबाद एन्काऊंटर प्रकरणाची चौकशी सर्वोच्च न्यायालयाच्या माजी न्यायाधीशांमार्फत होणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने एन्काऊंटर प्रकरणाची चौकशी करण्यासाठी तीन सदस्यांची समिती स्थापना केली आहे. या समितीचे अध्यक्ष सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश वी. एस शिरपूरकर असणार आहेत. ही समिती या प्रकरणाचा तपास करुन सहा महिन्याच्या आत आपला अहवाल न्यायालयासमोर सादर करणार आहे.

शिवसेनेशिवाय अशा पद्धतीने भाजपने राज्यसभेत आपले आकडे वाढवले...

दरम्यान, न्यायालयाचे पुढील आदेश येईपर्यंत अन्य कोणतंही न्यायालय किंवा प्राधिकरण या प्रकरणाची चौकशी करणार नाही, असे सर्वोच्च न्यायालयाने सांगितले. या प्रकरणाचा तपास पुढच्या ६ महिन्याच्या आत पूर्ण करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने या समितीला दिले आहे. हैदराबाद एन्काऊंटर प्रकरणाची सुनावणी गुरुवारी सर्वोच्च न्यायालयात झाली यावेळी न्यायालयाने याप्रकरणाच्या चौकशीसाठी समिती स्थापन केली. 

नागरिकत्व सुधारणा विधेयकाविरोधात IUML सुप्रीम कोर्टात

हैदराबादमध्ये महिला पशुवैद्यकीय डॉक्टरवर सामूहिक बलात्कार करुन तिची जाळून हत्या करणाऱ्या चारही आरोपीचे पोलिसांनी एन्काऊंटर केले. आरोपींनी पोलिसांची बंदूक हिसकावून पळून जाण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे पोलिसांनी केलेल्या गोळीबारात हे चौघेही मारले गेले होते. या प्रकरणाची राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने दखल घेत चौकशीचे आदेश दिले आहेत. तसंच एसआयटीमार्फेत देखील याप्रकरणाचा तपास सुरु आहे. 

काहीजण 'जनपथला' घाबरुन सभागृहातून पळाले: आशिष शेलार