पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

कमलनाथ सरकारला SCचा दणका; उद्या बहुमत सिध्द करण्याचे आदेश

मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ

सर्वोच्च न्यायालयाने कमलनाथ सरकारला मोठा दणका दिला आहे. कमलनाथ सरकारला शुक्रवारी संध्याकाळी ५ वाजेपर्यंत बहुमत चाचणी सिध्द करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. मध्य प्रदेशमधील विधानसभेचे अधिवेशन विश्वासदर्शक ठराव न मांडताच २६ मार्चपर्यंत स्थगित करण्यात आल्यानंतर भाजपने या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाचा धाव घेतली होती. यावर आज सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने कमलनाथ सरकारला बहुमत चाचणी सिध्द करण्याचे आदेश दिले.

सरकारच्या सूचनांचे पालन न करणाऱ्यांविरोधात कारवाई होणार: गृहमंत्री

सर्वोच्च न्यालायाने सुनावणी दरम्यान सांगितले की, 'जर बंडखोर आमदारांना विधानसभेत यायचे असेल तर कर्नाटक आणि मध्य प्रदेशच्या डीजीपींनी त्यांची सुरक्षा सुनिश्चित करावी. त्यांना विधानसभेत येण्यास कोणताही दबाव राहणार नाही. तसेच, न्यायालयाने सभागृहाच्या संपूर्ण कारवाईचे व्हिडिओ रेकॉर्डिंग करण्याचे आदेश दिले आहे. तसंच, विधानसभा अधिवेशनाचा एकमेव अजेंडा हा बहुमत सिद्ध करणे असेल. यामध्ये कोणालाही अडथळा आणू नये, असे देखील न्यायालयाने सांगितले. 

भारतात अद्याप कोरोनाचा समूह संसर्ग नाही, ICMR ची माहिती

यापूर्वी, मध्य प्रदेशचे राज्यपाल लालजी टंडन यांनी कमलनाथ सरकारला विधिमंडळातील पहिल्या अभिभाषणानंतर विश्वासदर्शक ठराव मांडावा असे निर्देश दिले होते. मात्र, कोरोना विषाणूमुळे विधानसभा अध्यक्षांनी विधानसभेचे कामकाज २६ मार्चपर्यंत तहकूब करण्याचे आदेश दिले होते. मात्र आता सर्वोच्च न्यायालयाने कमलनाथ सरकारला शुक्रवारी संध्याकाळी ५ वाजेपर्यंत बहुमत चाचणी सिध्द करण्याचे आदेश दिले. 

मोदी 'लॉक डाउन'ची घोषणा करणार ही फक्त अफवा