पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

कलम ३७० प्रकरण: ५ न्यायमूर्तींचे खंडपीठ करणार सुनावणी

सुप्रीम कोर्ट

कलम ३७० प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने केंद्रासह इतरांना नोटीस पाठवली आहे. यामध्ये न्यायालयाने असे म्हटले आहे की, कलम ३७० प्रकरण संविधान पीठाकडे सोपवण्यात आले आहे. या प्रकरणी दाखल करण्यात आलेल्या सर्व याचिकांवर पाच न्यायमूर्तींचे खंडपीठ सुनावणी करणार आहे. ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये सुनावणी करण्यात येणार आहे.

'जम्मू-काश्मीर प्रकरणात पाकिस्तानने हस्तक्षेप करण्याची गरज नाही'

तसंच, सर्वोच्च न्यायालयाने सीपीएमचे महासचिव सीताराम येचुरी यांना जम्मू-काश्मीरला जाण्याची परवानगी दिली आहे. त्यांना जम्मू काश्मीरला जाऊन पक्षाचे नेते आणि माजी आमदार युसूफ तारिगामी यांना भेटण्याची परवानगी देण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी सुनावणी दरम्यान ही माहिती दिली. तसंच न्यायालयाने याचिकाकर्ते मोहम्मद सय्यद यांना देखील जम्मू-काश्मीरमध्ये जाण्यास परवानगी दिली आहे. अनंतनाग येथे आई-वडिलांना भेटण्यास त्यांना परवानगी देण्यात आली. तसंच, न्यायालयाने जम्मू-काश्मीर सरकारला त्यांना पोलिस संरक्षण देण्यास सांगितले आहे.

राज्य सहकारी बँक घोटाळा: अजित पवारांची सुप्रीम कोर्टात धाव

कलम- ३७० प्रकरणी आज सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणी होणार आहे. जम्मू-काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे कलम- ३७० केंद्र सरकारने रद्द केले. त्यानंतर सरकारच्या या निर्णयाविरोधात अनेकांनी सर्वोच्च न्यायालयामध्ये धाव घेत याचिका दाखल केली होती. जम्मू-काश्मीरमध्ये संचार बंदीसह लागू करण्यात आलेले अन्य निर्बंध हटविण्याची मागणी याचिकाकर्त्यांनी केली आहे.कलम सरकारच्या निर्णयाविरोधात अधिवक्ता एमएल शर्मा, नॅशनल कॉन्फर्न्सचे खासदार मोहम्मद अकबर लोन, सेवानिवृत्त न्यायमूर्ती हसनैन मसूदी, माजी आयएएस अधिकारी शाह फैजल, जेएनयूची माजी विद्यार्थी शेहला रशीद आणि राधा कुमार यांसारखे अनेक दिग्गजांनी याचिका दाखल केली आहे.

धक्कादायक: पुण्यात तीन वर्षाच्या चिमुरडीवर रेल्वेमध्ये बलात्कार

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:supreme court issues says five judge constitution bench will hear all the petitions related article 370