पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

अयोध्या प्रकरण: हा कुणाचा विजय किंवा पराभव नव्हे - PM मोदी

पंतप्रधान नरेंद्र मोदी

अयोध्येतील वादग्रस्त जागेसंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निकाल हा कोणा एका पक्षाचा विजय किंवा दुसऱ्या पक्षाचा पराभव समजू नये, अशा शब्दांत पंतप्रधान नेरंद्र मोदींनी देशवासियांना शांतता कायम राखण्याचे आवाहन केले आहे. राम भक्त असा  किंवा रहिम भक्त ही वेळ राष्ट्रभक्तीची आहे. त्यामुळे देशवासियांनी शांती, सदभाव आणि एकता कायम राखावी, असे मोदींनी म्हटले आहे.

ऐतिहासिक निर्णय! अयोध्येतील वादग्रस्त जागा रामलल्लाची-सुप्रीम कोर्ट

सर्वोच्च न्यायालयाचा हा निकाल अनेक कारणासाठी महत्त्वपूर्ण आहे. कोणताही वाद मिटवण्यासाठी कायदेशीर प्रक्रिया सर्वोच्च असते, हे यातून प्रतित होते, असा उल्लेख मोदींनी आपल्या ट्विटमध्ये केला आहे. न्यायालयाने प्रत्येक पक्षकाराला बाजू मांडण्यासाठी आवश्यक वेळ दिला. न्यायालयाच्या या निर्णयानंतर देशवासियांनी आपल्यातील बंधुभाव आणि एकता दाखवून देण्याची वेळ आहे, असे मोदींनी म्हटले आहे. 

राम मंदिरासाठी सुप्रीम कोर्टाने सांगितला 'रोडमॅप'

अयोध्येतील वादग्रस्त जागा रामलल्लाची आहे, असा निकाल सर्वोच्च न्यायालयाने शनिवारी दिला. रामलल्लाचे कायदेशीर अस्तित्वही न्यायालयाने मान्य केले.  तसेच मुस्लिमांना मशीद उभारण्यासाठी ५ एकर पर्यायी जागा देण्याचे आदेश देण्यात आले आहेत. केंद्र सरकारने ३ महिन्यांत राम ट्रस्ट स्थापन करुन राम मंदिर उभारण्यासंदर्भातील आराखडा सादर करावा, असेही म्हटले आहे.   

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title: Supreme Court historic verdict on the Babri Masjid Ram Temple title dispute Prime Minister Narendra Modi said no one should look it as victory or defeat