पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

कलम- ३७० प्रकरणावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी

सुप्रीम कोर्ट

कलम- ३७० प्रकरणी आज सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणी होणार आहे. जम्मू-काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे कलम- ३७० केंद्र सरकारने रद्द केले. त्यानंतर सरकारच्या या निर्णयाविरोधात अनेकांनी सर्वोच्च न्यायालयामध्ये धाव घेत याचिका दाखल केली होती. या याचिकांवर आज सर्वोच्च न्ययालयात सुनावणी होणार आहे. या याचिकांमध्ये जम्मू-काश्मीरमध्ये संचार बंदीसह लागू करण्यात आलेले अन्य निर्बंध हटविण्याची मागणी करण्यात आली आहे.

राज्य सहकारी बँक घोटाळा: अजित पवारांची सुप्रीम कोर्टात धाव

कलम ३७० रद्द केल्याच्या सरकारच्या निर्णयाविरोधात अधिवक्ता एमएल शर्मा यांनी सर्वोच्च न्यायालयामध्ये सर्वात आधी याचिका दाखल केली. तर नॅशनल कॉन्फर्न्सचे खासदार मोहम्मद अकबर लोन आणि सेवानिवृत्त न्यायमूर्ती हसनैन मसूदी यांनी देखील केंद्र सरकारच्या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यालायामध्ये धाव घेतली होती. माजी आयएएस अधिकारी शाह फैजल, जेएनयूची माजी विद्यार्थी शेहला रशीद आणि राधा कुमार यांसारखे अनेक दिग्गजांचा देखील यामध्ये समावेश आहे. 

दिग्दर्शक प्रविण तरडे यांच्या गाडीला सासवडजवळ अपघात

दरम्यान, जम्मू-काश्मीरमध्ये कलम- ३७० हटवल्यानंतर अल्पसंख्याक कार्य मंत्रालयाची सहा सदस्यांची टीम मंगळवारी जम्मू-काश्मीरमध्ये दाखल झाली. ही टीम जम्मू-काश्मीरमध्ये दोन दिवसांचा दौरा करणार आहे. ही टीम जम्मू-काश्मीरच्या खोऱ्यामध्ये अल्पसंख्याकांशी संबंधित केंद्रीय योजना राबविल्या जाणाऱ्या क्षेत्रांची पाहणी करतील. या टीममध्ये संयुक्त सचिव  (पंतप्रधान जन विकास कार्यक्रम) निगार फातिमा, राष्ट्रीय अल्पसंख्याक विकास व वित्त निगमचे प्रमुख शहबाज अली, केंद्रीय वक्फ परिषदेचे सदस्य एसएएस नक्वी आणि मंत्रालयाचे दोन अधिकारी या टीममध्ये सहभागी आहेत.

भायखळ्यातील लाकडाच्या वखारीला भीषण आग