पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

कोस्टल रोड प्रकल्पाचा मार्ग मोकळा; सुप्रीम कोर्टाकडून हिरवा कंदील

कोस्टल रोड प्रकल्प

महाराष्ट्र सरकार आणि मुंबई महानगर पालिकेच्या महत्वकांक्षी कोस्टल रोड प्रकल्पाला सर्वोच्च न्यायालयाने हिरवा कंदील दिला आहे. कोस्टल रोड प्रकल्पाला मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर १९ जुलैपासून स्थगिती देण्यात आली होती. सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी ही स्थगिती उठवली आहे. त्यामुळे कोस्टल रोड प्रकल्पाचा मार्ग मोकळा झाला आहे. 

 

देशद्रोहाच्या खटल्यात पाकिस्तानात परवेझ मुशर्रफ यांना फाशीची शिक्षा

कोस्टल रोड प्रकल्पामुळे पर्यावरणाला हानी पोहचत असल्याचा आरोप चुकीचा असल्याचे सांगत राज्य सरकारनं सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. यावर आज सुनावणी झाली. 'कोस्टल रोडचे काम करण्यास परवानगी देत आहोत. मात्र प्रकल्पाशेजारी इतर विकास काम करु नका, असे सर्वोच्च न्यायालयाने सुनावणी दरम्यान स्पष्ट केले आहे.  तसंच शहरातील वाहतूक कोंडीचा विचार करता मुंबईसाठी वाहतुकीचे नवे पर्याय निर्माण करणे काळाची गरज असल्याचे देखील सर्वोच्च न्यायालयाने सांगितले. 

'घटनाबाह्य कायदा सरकारने मागे घ्यावा, नाही तर...'