पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

INX मीडिया प्रकरणात चिदंबरम यांना जामीन, पण तूर्त तुरूंगातून सुटका नाही

पी. चिदंबरम

आयएनएक्स मीडिया प्रकरणात केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) दाखल केलेल्या गुन्ह्यात माजी केंद्रीय अर्थमंत्री आणि काँग्रेस नेते पी चिदंबरम यांना सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी जामीन मंजूर केला. पण या प्रकरणाचा तपास दोन केंद्रीय तपास संस्थांकडून सुरू आहे. सक्तवसुली संचालनालयाकडूनही (ईडी) या प्रकरणाचा तपास सुरू आहे. चिदंबरम हे सध्या २४ ऑक्टोबरपर्यंत ईडीच्या कोठडीत आहेत. त्यामुळे जामीन मंजूर झाला असला, तरी ते लगेच कारागृहातून बाहेर येण्याची शक्यता नाही.

तेजस एक्स्प्रेसमधील प्रवाशांच्या चाळ्यांनी हॉस्टेस वैतागल्या

आयएनएक्स मीडिया प्रकरणात चिदंबरम यांना २१ ऑगस्ट रोजी नवी दिल्लीमध्ये नाट्यमय घडामोडींनंतर अटक करण्यात आली होती. त्यानंतर ते सीबीआयच्या कोठडीत होते. चौकशी पूर्ण झाल्यावर त्यांची रवानगी तिहार तुरुंगात न्यायालयीन कोठडीत करण्यात आली. या प्रकरणी ईडीकडूनही तपास करण्यात येतो आहे. सध्या चिदंबरम हे ईडीच्या कोठडीत आहेत. या प्रकरणात सीबीआयने आपले आरोपपत्र न्यायालयात दाखलही केले आहे.

मुलुंडमध्ये नाराज पीएमसी बँक खातेधारांनी निवडला 'नोटा' पर्याय

जर चिदंबरम यांना इतर कोणत्या प्रकरणात अटक करण्यात आलेली नसेल तर त्यांची एक लाख रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर सुटका करण्यात यावी, असे आदेश न्यायालयाने दिले आहेत. या प्रकरणात चौकशीसाठी चिदंबरम यांनी सांगेल त्यावेळी उपस्थित राहावे, असेही आदेश त्यांना देण्यात आले आहेत.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:Supreme Court grants bail to Congress leader P Chidambaram in the INX Media case registered by the CBI