पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

राफेल विमान खरेदी : फेरविचार याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या

राफेल खरेदी प्रकरण

राफेल लढाऊ विमाने फ्रान्समधील दसॉल्ट एव्हिएशन कंपनीकडून खरेदी करण्यात कोणताही गैरप्रकार झाला नसल्याचा निर्वाळा देणारा आपला आधीचा निकाल सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी कायम ठेवला. या निकालाविरोधात दाखल झालेल्या सर्व फेरविचार याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या आहेत. त्यामुळे केंद्र सरकारला मोठा दिलासा मिळाला आहे. 

शबरीमला मंदिरात महिलांना प्रवेशाचे प्रकरण आता घटनापीठाकडे

राफेल खरेदीमध्ये गैरप्रकार झाल्याचा आरोप विरोधकांनी आणि काही इतर राजकीय नेत्यांनी केला होता. मेमध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीतही हा मुद्दा विरोधकांनी आणि विशेषतः काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी लावून धरला होता. १० मे रोजी सर्वोच्च न्यायालयाने फेरविचार याचिकेवरील आपला निकाल राखून ठेवला होता.

'भाजपपेक्षा शिवसैनिकांना नरेंद्र मोदींचा जास्त आदर आणि म्हणूनच...'

दसॉल्ट एव्हिएशन कंपनीकडून ३६ राफेल विमाने खरेदी करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला. या खरेदीमध्ये गैरप्रकार असल्याचे विरोधकांचे म्हणणे होते. पण १४ डिसेंबर २०१८ रोजी दिलेल्या निकालात न्यायालयाने हे सर्व आरोप फेटाळले होते. त्यावरच न्यायालयाने पुन्हा शिक्कामोर्तब केले.

सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या नेतृत्त्वाखालील खंडपीठाने हा निकाल दिला. खंडपीठामध्ये न्या. एस के कौल आणि न्या. के एम जोसेफ यांचाही समावेश होता. याचिकाकर्त्यांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून केंद्रीय अन्वेषण विभागाकडून (सीबीआय) तपास करण्याचे आदेश देण्यात यावेत, अशी मागणी केली आहे. पण याचा विचार मूळ निकाल देताना न्यायालयाने गुणवत्तेच्या आधारावर केला आहे. त्यामुळे परत त्याचा फेरविचार करण्याची गरज नाही, असे न्यायालयाने म्हटले आहे.

दरम्यान, न्या. जोसेफ यांनी त्यांचे स्वतःचे वेगळे निरीक्षण नोंदविताना जर या प्रकरणात काही गैरप्रकार झाल्याचे केंद्रीय तपास संस्थांना वाटत असेल, तर त्यांनी स्वतःहून तपास केला पाहिजे, असे सांगितले. माजी केंद्रीय मंत्री यशवंत सिन्हा, अरूण शौरी आणि ज्येष्ठ वकील प्रशांत भूषण हे या प्रकरणातील प्रमुख याचिकाकर्ते होते.