पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

आरेमधील वृक्षतोडीला सुप्रीम कोर्टाची तूर्त स्थगिती

सर्वोच्च न्यायालय

आरे कॉलनीतील वृक्षतोडीला सोमवारी सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली. त्यामुळे तूर्त या ठिकाणी वृक्षतोड करता येणार नाही. गेल्या आठवड्यात शुक्रवारी रात्री या ठिकाणी मुंबई मेट्रो रेल्वे महामंडळाने शेकडो झाडे तोडल्यामुळे वातावरण तापले होते. पर्यावरणप्रेमी लोकांनी वृक्षतोडीला विरोध केला होता. या प्रकऱणी २९ जणांना अटकही करण्यात आली होती. या प्रकरणी पुढील सुनावणी २१ ऑक्टोबर रोजी होणार आहे. तोपर्यंत या वृक्षतोडीला स्थगिती देण्यात आली आहे.

मुंबईत भिकाऱ्यांची संपत्ती बघून पोलिसही चक्रावले, बँकेत ८ लाखांच्या FD

आरेमध्ये तूर्त यापुढे कोणतेही झाड तोडले जाणार नाही, असे आश्वासन महाराष्ट्र सरकारच्या वतीने महाधिवक्ता तुषार मेहता यांनी दिले. न्या. अरूण मिश्रा यांच्या नेतृत्त्वाखाली खंडपीठापुढे या प्रकरणी सुनावणी झाली. ज्या ठिकाणी वृक्षतोड केली जात आहे. तो पट्टा जैवविविधतेचा पट्टा आहे का, असा प्रश्न न्यायालयाने उपस्थित केला. त्याचबरोबर आम्हाला असे सांगण्यात आले आहे की हा भाग केवळ ना विकास क्षेत्र आहे. जर तसे असेल तर आम्हाला तशी कागदपत्रे दाखवावीत, असे आदेश न्यायालयाने दिले.

शुक्रवारी रात्री आरेमधील वृक्षतोडीला सुरुवात झाल्यावर त्याला देशभरातून तीव्र विरोध करण्यात येऊ लागला. अनेक पर्यावरणप्रेमी नागरिक या ठिकाणी पोहोचले. त्यामुळे तिथे आंदोलन सुरू झाले. परिस्थिती चिघळू नये, म्हणून मुंबई पोलिसांनी या परिसरात जमावबंदीचे आदेश लागू केले होते. पोलिसांनी शनिवारी २९ जणांना अटक केली होती. या सर्वांना नंतर जामीन मंजूर करण्यात आला. 

धक्कादायक! भुसावळमध्ये भाजप नगरसेवकांसह कुटुंबातील ५ जणांची हत्या

मुंबई मेट्रो ३च्या कारशेडसाठी आरे कॉलनीतील दोन हजार झाडे तोडण्यात येणार आहेत. त्याला पर्यावरणप्रेमी नागरिकांचा विरोध आहे. मुंबई उच्च न्यायालयाने या प्रकरणी दाखल सर्व विरोधी याचिका फेटाळल्या होत्या. त्याचबरोबर वृक्षतोड प्राधिकरणानेही वृक्षतोडीला मंजुरी दिली होती. त्यानंतर तातडीने मुंबई मेट्रो रेल्वे महामंडळाने शुक्रवारी रात्री वृक्षतोडीला सुरुवात केली होती.