पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

सर्वोच्च न्यायालयाने गुरु रविदास मंदिर पुन्हा उभारण्याची दिली परवानगी

सर्वोच्च न्यायालय

सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी गुरु रविदास मंदिर आधीच्याच ४०० चौ.मीटर जागेवर पुन्हा एकदा उभारण्यास परवानगी दिली आहे. गेल्या ऑगस्ट महिन्यात रविदास मंदिर पाडण्यात आले होते. त्याचबरोबर मंदिर पाडताना ज्या लोकांना आंदोलन केल्यामुळे अटक करण्यात आली होती. त्या सर्वांना मुक्त करण्याचा आदेशही न्यायालयाने दिला आहे. 

१५ व्या शतकातील हे मंदिर दिल्ली विकास प्राधिकरणाने (डीडीए) सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने मंदिर पाडले होते. कारण हे मंदिर वन खात्याच्या जमिनीवर उभारण्यात आले होते.

दरम्या, विरोधी पक्ष आणि दलित संघटनांच्या विरोधानंतर केंद्र सरकारने या महिन्याच्या सुरुवातीस मंदिरासाठी २०० मीटर जमीन मंदिरासाठी देण्याचा प्रस्ताव दिला होता. 

परंतु, सोमवारी झालेल्या सुनावणीदरम्यान केंद्र सरकारच्या वतीने न्यायालयात बाजू मांडणारे अॅटर्नी जनरल के के वेणुगोपाल यांनी ती दुप्पट करत ४०० चौ. मीटर केले. न्या. अरुण मिश्रा यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठाने हा प्रस्ताव स्वीकारला आणि मंदिर पाडल्यानंतर विरोध करताना अटक केलेल्या सर्व आंदोलकांना सोडण्याचे आदेश दिले. 

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:Supreme Court allows permission to rebuild the demolished Guru Ravidas Temple on forest land