पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

नजरकैदेत असलेल्या आईला भेटण्याची मेहबुबा मुफ्तींच्या मुलीला परवानगी

मेहबुबा मुफ्ती

जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांच्या मुलीला त्यांना भेटण्याची परवानगी देण्यात आली आहे. मेहबूबा मुफ्ती यांच्या मुलीने सुप्रीम कोर्टामध्ये याचिका दाखल केली होती. या याचिकेच्या माध्यमातून तिने आई मेहबूबा मुफ्ती यांना भेटण्याची इच्छा व्यक्त करत परवानगी देण्यात यावी अशी मागणी केली होती. सुप्रीम कोर्टाने आज तिला मेहबूबा मुफ्ती यांना भेटण्याची परवानगी दिली. जम्मू-काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे कलम ३७० रद्द करण्यात आले. तेव्हापासून मेहबूबा मुफ्ती या नरजकैदेत आहेत.

चिदंबरम यांना धक्का, अटकपूर्व जामीन अर्ज सुप्रीम कोर्टाने फेटाळला

एएनआय या वृत्त संस्थेने दिलेल्या माहितीनुसार, सुप्रीम कोर्टाने जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांची मुलगी इल्तिजाला आपल्या आईला भेटण्यासाठी चेन्नईवरुन श्रीनगरला येण्याची परवानगी दिली आहे. तसंच कोर्टाने सांगितले की, ती श्रीनगरच्या इतर भागामध्ये जाऊ शकते. मात्र गरज पडल्यास तिला त्यासाठी अधिकाऱ्यांकडून आधी परवानगी घ्यावी लागेल. 

कोहिनूर मिल प्रकरण: ईडीकडून नितीन सरदेसाई यांची चौकशी

इल्तिजाने बुधवारी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करत आईच्या तब्येतीची खूप काळजी वाटत आहे. तसंच तिला गेल्या एका महिन्यापासून भेटले नसल्याचे म्हटले होते. आज या याचिकेवर सुनावणी करताना सुप्रीम कोर्टाने तिला आईला भेटण्याची परवानगी दिली. याआधी माकपचे महासचिव सीताराम येचुरी यांना २८ ऑगस्ट रोजी श्रीनगरला जाण्याची परवानगी कोर्टाने दिली होती. त्यांनी पक्षाचे आजारी नेते मोहम्मद युसूफ तारिगामी यांना भेटण्याची परवानगी मागितली होती. 

मलेशियासोबतच्या चर्चेत मोदींनी मांडला झाकीर नाईक प्रत्यार्पणाचा मुद्दा