पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

गुलाम नबी आझाद कुटुंबीयांची घेणार भेट; सुप्रीम कोर्टाने दिली परवानगी

गुलाम नबी आझाद

जम्मू-काश्मीच्या मुद्दयावरुन दाखल करण्यात आलेल्या याचिकांवर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली. यावेळी सुप्रीम कोर्टाने काँग्रेस नेते गुलाम नबी आझाद यांना जम्मू-काश्मीरला जाण्यासाठी परवानगी दिली. गुलाम नबी आझाद यांनी कुटुंबीय आणि नातेवाईकांना भेटण्यासाठी जम्मू-काश्मीरला जाता यावे यासाठी सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती.

'गरज पडल्यास मी स्वत: जम्मू-काश्मीर उच्च न्यायालयात जाईन' 

जम्मू-काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे कलम- ३७० रद्द केल्यानंतर गुलाम नबी आझाद यांनी जम्मू-काश्मीरला आपल्या घरी जाण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांना विमानतळावर अडवून परत दिल्लीला पाठवण्यात आले होते. त्यामुळे आझाद यांनी थेट सुप्रीम कोर्टात धाव घेत याचिका दाखल केली होती. आज या याचिकेवर सुनावणी झाली. सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश रंजन गोगोई, न्यायमूर्ती एस. ए. बोबडे आणि न्यायमूर्ती एस. अब्दुल. नजीर यांच्या खंडपीठापुठे सुनावणी झाली. कोर्टाने त्यांना जम्मू-काश्मीरला जाण्याची परवानगी दिली.

फारुख अब्दुल्ला सार्वजनिक सुरक्षा कायद्यांतर्गत स्थानबद्ध

सुप्रीम कोर्टाने परवानगी दिल्यामुळे गुलाम नबी आझाद आपल्या कुटुंबीयांना आणि नातेवाईकांना भेटू शकणार आहेत. बारामुल्ला, अनंतनाग, श्रीनगर आणि जम्मू-काश्मीर या जिल्ह्यांचा दौरा ते करु शकतात. गुलाम नबी आझाद यांनी कोर्टाला सांगितले की, यावेळी ते कोणत्याही सभेमध्ये सहभागी होणार नाही. तसंच यावेळी त्यांना राजकीय कार्यक्रमात देखील सहभागी होता येणार नाही. 

'देवच या देशाचं रक्षण करो'; वाढदिवसानिमित्त चिदंबरम यांचे टि्वट