पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

देशात सध्या 'सुपर इमर्जन्सी', ममता बॅनर्जींचा मोदींवर घणाघात

ममता बॅनर्जी

१९७५ मध्ये देशात लादण्यात आलेल्या आणीबाणीचा आज स्मृतिदिन असला, तरी देशात गेल्या पाच वर्षांपासून आणखी तीव्र आणीबाणी (सुपर इमर्जन्सी) असल्यासारखी स्थिती आहे, अशी टीका पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव न घेता त्यांच्यावर केली. 

ममता बॅनर्जी यांनी केलेल्या ट्विटमध्ये लिहिले आहे की, १९७५ मध्ये देशात लागू कऱण्यात आलेल्या आणीबाणीचा आज स्मृतिदिन आहे. पण गेल्या पाच वर्षांपासून देशात सुपर इमर्जन्सी लागू आहे. इतिहासात काय घडले, यापासून आपण सर्वांनी धडा घेतला पाहिजे. देशातील लोकशाही संस्था जपण्यासाठी सर्वांनी एकत्रितपणे प्रयत्न केले पाहिजेत.

माजी पंतप्रधान दिवंगत इंदिरा गांधी यांनी १९७५ मध्ये आजच राष्ट्रीय आणीबाणी जाहीर केली होती. त्यामुळे नागरिकांच्या स्वातंत्र्यावर गदा आली होती. २१ मार्च १९७७ पर्यंत ही आणीबाणी लागू होती.