पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

अयोध्या निकाल : कोर्टाच्या निकालाला आव्हान न देण्याचा सुन्नी वक्फ बोर्डाचा निर्णय

अयोध्या निकाल

अयोध्येतील रामजन्मभूमी-बाबरी मशिद प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाला आव्हान न देण्याचा निर्णय सुन्नी सेंट्रल वक्फ बोर्डाने घेतला आहे. ९ नोव्हेंबरला सर्वोच्च न्यायालयाने अयोध्येतील वादग्रस्त जागा रामलल्ला विराजमान अर्थात हिंदू पक्षकारांना देण्याचा निकाल दिला होता. त्याचवेळी अयोध्येतील एकूण जागेपैकी ५ एकर जागा सुन्नी वक्फ बोर्डाला म्हणजे मुस्लिम पक्षकारांना देण्याचेही न्यायालयाने आपल्या आदेशात म्हटले होते. पण सरकार आम्हाला नक्की जागा कुठे देते हे पाहून याबद्दल निर्णय आम्ही घेऊ, असेही बोर्डाने स्पष्ट केले. बोर्डाचे ज्येष्ठ सदस्य अब्दुल रज्जाक खान यांनी या निर्णयाबद्दल माहिती दिली.

सत्तेसाठीची लाचारी तुम्हाला लखलाभ, फडणवीसांचा सेनेला टोला

रामजन्मभूमी-बाबरी मशिद प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाला आव्हान दिले पाहिजे, यासाठी अब्दुल रज्जाक खान हेच आधीपासून आग्रही होते. पण आता त्यांनी सरकारकडून आम्हाला कोणती जागा दिले जाते, ते पाहून पुन्हा वक्फ बोर्डाची बैठक बोलावण्यात येईल. त्यानंतर आम्ही निर्णय घेऊ, असे स्पष्ट केले.

सत्तास्थापन करणाऱ्यांना शुभेच्छा! फडणवीसांचा राजीनामा

माजी सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या नेतृत्त्वाखालील पाच न्यायाधीशांच्या खंडपीठाने अयोध्या प्रकरणी निकाल दिला होता. या निकालाचे देशभरात स्वागत करण्यात आले होते. पण काही मुस्लिम समुदायाने पाच एकरची जागा न घेण्याची मागणी सुन्नी वक्फ बोर्डाकडे केली आहे. दरम्यान, या प्रकरणातील अन्य तीन मुस्लिम पक्षकारांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाविरोधात फेरविचार याचिका दाखल करण्याचे निश्चित केले आहे.