पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

JNU हिंसाचार: अशा घटनांमुळे देशाची प्रतिमा ढासळते : इरफान पठाण

इरफान पठाण

जेएनयूतील हिंसाचाराचे पडसाद देशभरात उमटत असताना या प्रकरणाबाबत आता माजी क्रिकेटर इरफान पठाणने आपल्या मनातील भावना व्यक्त केल्या आहेत. रविवारी संध्याकाळच्या दरम्यान जेएनयूमध्ये काही अज्ञातांनी तोंडाला रुमाल बांधून कँम्पसमध्ये घुसून विद्यार्थ्यांना मारहाण केल्याचा प्रकार घडला होता. या प्रकरणामुळे राजकीय क्षेत्रासह शिक्षण क्षेत्रातील वातावरण चांगलेच ढवळून निघाले आहे. 

JNU Violence : NCP चे युवा आमदार रोहित पवारांनी विचारले संतप्त सवाल

जेएनयूमध्ये घडलेला प्रकार हा निंदणीय आहे. अशा घटनांमुळे देशाची प्रतिमा खराब होते, अशा शब्दांत इरफानने घटनेचा निषेध व्यक्त केलाय. त्याने ट्विटमध्ये लिहलंय की, जेएनयूच्या कँम्पसमध्ये घडलेली घटना ही सामान्य नाही. कँम्पसमध्ये हत्यारासह लोक घुसले. त्यांनी विद्यार्थ्यांना अमानूषपणे मारहाण केली. अशा प्रकरामुळे देशाची प्रतिमा मलीन होते. 

जेएनयू हिंसाचार: कुलुगुरुंना हटवण्याची मागणी

जेएनयू कँम्पसमध्ये झालेल्या मारहाणीमध्ये जवळपास १८ विद्यार्थी जखमी झाले आहेत. हल्लेखोरांनी प्राध्यापकांनाही मारहाण केली होती. इरफान पठाण पूर्वी माजी क्रिकेटर आणि भाजप खासदार गौतम गंभीर यांनी देखील यासंदर्भात गंभीर प्रतिक्रिया दिली होती. हल्लेखोरांवर कठोर कारवाई करायला हवी, अशी मागणी देखील त्यांनी ट्विटच्या माध्यमातून केली होती. 

विद्यार्थ्यांचा आवाज दाबण्याचा वारंवार प्रयत्न सुरु: सोनिया गांधी

जेएनयूतील प्रकरणानंतर देशभरातील विविध राज्यांत आंदोलन करुन निषेध व्यक्त करण्यात येत आहे. मुंबईमधील गेट वे ऑफ इंडिया येथे आंदोलन करुन या घटनेचा निषेध नोंदवण्यात आला. पुण्यामध्ये देखील विद्यार्थ्यांनी आंदोलन करत जेएनयूतील प्रकार धक्कादायक असल्याच्या भावना व्यक्त करण्यात आल्या. जेएनयूतील हिंसाचाराच्या घटनेनंतर आता कुलगुरु एम. जगदीश कुमार यांना हटवण्याची मागणी जोर धरु लागली आहे. जेएनयू विद्यार्थी संघटना आणि शिक्षकांनी कुलगुरुंवर हिंसक जमावाचा भाग असल्याचा आणि विद्यापीठात हिंसाचाराला प्रोत्साहन दिल्याचा आरोप करण्यात येत आहे.