पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

सुब्रमण्यम स्वामींचा घरचा आहेर, १ फेब्रुवारीपासून बंदी का घातली नाही?

सुब्रमण्यम स्वामी

भाजपचे नेते सुब्रमण्यण स्वामी यांनी आता आपल्या पक्षाच्या सरकारलाच घरचा आहेर दिला आहे. परदेशातून भारतात येणाऱ्या नागरिकांवर एक फेब्रुवारीपासूनच बंदी का घातली गेली नाही, असा प्रश्न त्यांनी विचारला आहे. जर एक फेब्रुवारीलाच ही बंदी घातली असती तर दिल्लीत निजामुद्दीनमध्ये तबलिगी समाजाच्या धार्मिक कार्यक्रमात जे घडले ते निश्चितपणे घडले नसते, असा दावा त्यांनी केला.

लॉकडाऊन : बेजबाबदारपणे वागणाऱ्यांची आता खैर नाही, अजित पवारांचा इशारा

सुब्रमण्यम स्वामी यांनी केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, परदेशातून येणाऱ्या नागरिकांवर एक फेब्रुवारीपासूनच बंदी घातली गेली असती तर दिल्लीत तबलिगी समाजाच्या कार्यक्रमात जे घडले ते घडले नसते. त्याचवेळी परदेशात गेलेल्या आणि तेथून परतणाऱ्या नागरिकांनाही एक फेब्रुवारीपासूनच विमानतळाजवळच्या हॉटेलमध्ये १४ दिवस ठेवायला हवे होते. तसे केले असते तर आजची परिस्थिती ओढावली नसती. ही बंदी घालायला एवढा उशीर का लावण्यात आला, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.

VIDEO: सफाई कामगारावर नागरिकांकडून फुलांचा वर्षाव

कोरोना विषाणूचे संक्रमण रोखण्यासाठी सरकारने संपूर्ण देशात २१ दिवसांचा लॉकडाऊन जाहीर केला आहे. गेल्या बुधवारपासून (२५ मार्च) हा लॉकडाऊन सुरू झाला. या काळात देशातील दळणवळणाची सर्व साधने रेल्वे, विमान, बस पूर्णपणे बंद ठेवण्यात आले आहेत. त्यातच काही दिवसांपूर्वी दिल्लीतील तबलिगी समाजाच्या मरकजमधून खूप जणांना कोरोना विषाणूचा संसर्ग झाल्याचे स्पष्ट झाले. दिल्ली पोलिसांनी या ठिकाणाहून २३१७ लोकांना हटविले आहे. ६०० पेक्षा जास्त जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या सर्व पार्श्वभूमीवर सुब्रमण्यम स्वामी यांनी हे विधान केले आहे.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:subramanian swamy says why ban not imposed on foreigners around 1 february tablighi jamaat case wont happen