पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

लेफ्टनंट शिवांगी ठरल्या नौदलातील पहिल्या महिला पायलट

लेफ्टनंट शिवांगी

लेफ्टनंट शिवांगी या नौदलात पहिल्या महिला पायलट म्हणून  रुजू झाल्या आहेत. केरळमधील कोची  तळावर त्या सोमवारी रुजू झाल्या आहेत. त्यांना डॉर्निअर विमान उडवण्याची परवानगी मिळाली आहे. 

'पंकजा मुंडे काय अनेक प्रमुख नेते शिवसेनेच्या संपर्कात'

नौदलातील पहिल्या महिला पायलट ठरलेल्या शिवांगी यांच्यावर देशभरातून कौतुकांचा वर्षाव होत आहे. शिवांगी या मुझफ्फरपूर इथल्या रहिवाशी आहेत.  

'मी खूप पूर्वीपासूनच महिला पायलट होण्याचं स्वप्न पाहत होती, आणि आता इतक्या वर्षांच्या प्रयत्नानंतर हे स्वप्न प्रत्यक्षात उतरलं आहे, याचा  सर्वाधिक आनंद मला होत आहे. या आनंदाचं शब्दात वर्णन करता येणार नाही. आता मी माझं पुढील प्रशिक्षण पूर्ण करण्याची वाट पाहत आहे', असं  शिवांगी एएनआयला दिलेल्या प्रतिक्रियेत म्हणाल्या. 

हैदराबाद बलात्कार प्रकरण : 'निर्भया'च्या आईची विनंती