पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

संपकरी डॉक्टर ममतांशी चर्चा करण्यास तयार, पण..

डॉक्टरांचा संप मिटण्याचे संकेत

पश्चिम बंगालमधील संपकरी डॉक्टरांनी रविवारी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याशी चर्चा करुन संप मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. कोणताही संभ्रम निर्माण होऊ नये याची खबरदारी म्हणून  प्रसारमाध्यमांसमोरच चर्चा करण्याची अट डॉक्टरांनी घातली आहे. एनआरएस मेडिकल कॉलेज आणि रुग्णालयातील डॉक्टरांनी जनरल बॉडीच्या बैठकीनंतर एका प्रतिनिधीने प्रसारमाध्यमाला दिलेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी नुकतीच दिलेली मुलाखत ही संभ्रम निर्माण करणारी आहे. त्यामुळे आमच्या आंदोलनाकडे चुकीच्या पद्धतीने पाहिले गेले. यासंदर्भात स्पष्टीकरणाची गरज आहे.  

रुग्ण तुमच्या प्रतिक्षेत, ममतांचे संपकरी डॉक्टरांना भावनिक आवाहन

या संपामध्ये सरकारी आरोग्य सेवेवर परिणाम झाला आहे. संपात सहभागी झालेल्या सर्व रुग्णालयाचे प्रतिनिधी या बैठकीला उपस्थित होते. आम्ही मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करुन संप मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. पारदर्शकतेसाठी आम्ही त्यांच्यासोबत होणारी चर्चा ही प्रसारमाध्यमांसमोर करण्याचे ठरवले आहे.  

डॉक्टरांनी केलेल्या मागण्यासंदर्भातील सरकारची भूमिका स्पष्टपणे जाणून घेत लवकर कामावर रुजू होण्यास तयार आहोत, असेही प्रतिनिधीने सांगितले. यापूर्वी पश्चिम बंगालमधील संपाच्या पार्श्वभूमीवर डॉक्टरांनी दोनवेळा मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी दिलेला चर्चेचा प्रस्ताव नाकारला होता. सरकारला डॉक्टरांच्या मागण्या मान्य आहेत. चर्चेसाठी कधीही त्यांच्यासाठी दरवाजे खुले आहेत, असे ममता बॅनर्जी यांनी म्हटले होते.

Doctors Strike : डॉक्टरांनी नाकारली ममतांची ऑफर