पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

फसवणूक प्रकरणी भारतीय उद्योजक प्रमोद मित्तल यांना अटक

प्रमोद मित्तल

जगप्रसिध्द स्टील क्षेत्रातील दिग्गज उद्योगपती लक्ष्मी मित्तल यांच्या छोट्या भावाला अटक करण्यात आली आहे. प्रमोद मित्तल यांना फसवणूक केल्याप्रकरणी बोस्निया येथे अटक करण्यात आली आहे. प्रमोद मित्तल हे देखील स्टील उद्योजक आहेत. जगातील अनेक देशामध्ये ते स्टीलचा व्यवसाय करतात. बोस्नियाच्या एका सरकारी वकिलाने दिलेल्या माहितीनुसार, फसवणूक आणि पदाचा दुरुपयोग केल्याच्या आरोपावरुन प्रमोद मित्तल यांना बोस्निया पोलिसांनी अटक केली. त्यांना बुधवारी कोर्टामध्ये हजर केले जाणार आहे. 

पिंपरीमध्ये लघुशंकेवरुन वाद; अपहरण करुन तरुणाची हत्या

हे प्रकरण लुकावासच्या उत्तर-पूर्व भागातील जीआयकेआयएल कंपनीच्या संबंधित फसवणुकीशी जोडलेले आहे. अशी माहिती समोर आली आहे की, प्रमोद मित्तल हे २००३ मध्ये जीआयकेआयएल या स्टील बनवणाऱ्या कंपनीचे संचालक राहिले आहेत. तसंच ते या कंपनीच्या सुपरवायजर बोर्डाचे अध्यक्ष आहेत. ही कंपनी बोस्नियामध्ये टॉप एक्सपोर्ट्समध्ये सहभागी असून या कंपनीत एक हजार कर्मचारी काम करतात. 

पहिले राफेल विमान सप्टेंबरमध्ये हवाई दलाच्या ताफ्यात

फसवणूक प्रकरणी प्रमोद मित्तल यांच्यासह कंपनीचे जनरल मॅनेजर परमेश भट्टाचार्य आणि सुपरवायजर बोर्डाच्या आणखी एका सदस्याला पोलिसांनी अटक केली आहे. या सर्वांवर कंपनीचे २८ लाख डॉलर म्हणजे १९.३२ कोटी रुपयांच्या फसवणुकीचा आरोप आहे. याआधी मार्च महिन्यामध्ये लक्ष्मी मित्तल यांनी त्याचा भाऊ प्रमोद मित्तल याला १,६०० कोटी रुपये देऊन एका गुन्ह्यामधून वाचवले होते. 

मोदी सरकारविरोधात अण्णा हजारे पुन्हा आंदोलन करणार?