पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

गुजरातमधील स्टॅच्यू ऑफ युनिटीने अमेरिकेतील स्टॅच्यू ऑफ लिबर्टीला या बाबतीत टाकले मागे

स्टॅच्यू ऑफ युनिटी

गुजरातमधील सरदार वल्लभभाई पटेल यांचा भव्य पुतळा अर्थात स्टॅच्यू ऑफ युनिटीने अमेरिकेतील १३३ वर्षे जुन्या स्टॅच्यू ऑफ लिबर्टीला एका मुद्द्यावर मागे टाकले आहे. स्टॅच्यू ऑफ युनिटी पाहण्यासाठी येणाऱ्या दैनंदिन पर्यटकांची संख्या ही स्टॅच्यू ऑफ लिबर्टी पाहण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांपेक्षा जास्त आहे. गुजरातमधील ही भव्य कलाकृती पाहण्यासाठी रोज सुमारे १५००० पर्यटक येतात.

अनैतिक संबंधांच्या संशयावरून सासऱ्याचा सूनेवर आणि पत्नीवर चाकूने हल्ला

१ नोव्हेंबर २०१८ ते ३१ ऑक्टोबर २०१९ या एका वर्षाच्या काळात स्टॅच्यू ऑफ युनिटी पाहण्यासाठी आलेल्या पर्यटकांची सरासरी संख्या १५००० झाली आहे. आठवड्याच्या अखेरिस म्हणजे शनिवारी, रविवारी या ठिकाणी २२४३० पर्यटक येतात. त्याचवेळी स्टॅच्यू ऑफ लिबर्टी पाहण्यासाठी अमेरिकेत दररोज १०००० पर्यटक येतात, अशी माहिती सरदार सरोवर नर्मदा निगम लिमिटेडने दिली.

HTLS 2019 : नरेंद्र मोदींच्या त्या मुलाखतीबद्दल अक्षय कुमार म्हणाला...

देशाचे पहिले गृहमंत्री राहिलेल्या सरदार वल्लभभाई पटेल यांचा पूर्णाकृती पुतळा या ठिकाणी उभारण्यात आला आहे. त्याची उंची १८२ मीटर आहे. हा जगातील सर्वांत उंच पुतळा आहे. गुजरातमध्ये सरदार सरोवर धरणाजवळ केवडिया कॉलनीमध्ये हा पुतळा उभारण्यात आला आहे. गेल्या वर्षी ३१ ऑक्टोबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या भव्य पुतळ्याचे अनावरण केले होते.