पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

जेएनयूमध्ये उद्घाटनापूर्वीच स्वामी विवेकानंदाच्या पुतळ्याची तोडफोड

जेएनयूमध्ये विवेकानंदांच्या पुतळ्याची तोडफोड

दिल्लीतील जवाहरलाल नेहरु विद्यापीठात धक्कादायक घटना घडली आहे. उद्घाटनापूर्वी स्वामी विवेकानंद यांच्या पुतळ्याची तोडफोड करण्यात आली आहे. पुतळ्याची तोडफोड केल्यानंतर त्याच्याखाली भाजपविरोधात अपशब्द लिहण्यात आले आहेत. या घटनेमुळे पुन्हा जेएनयू विद्यापीठातील वाद चव्हाट्यावर आला आहे. हा प्रकार कोणी केला आहे याचा तपास पोलिसांकडून सुरु आहे.

मूडीजकडून पुन्हा धक्का, विकासदर आणखी घटण्याचा अंदाज

गेल्या १५ दिवसांपासून जेएनयूमध्ये विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरु आहे. फी वाढ आणि हॉस्टेलच्या नियमांमध्ये केलेल्या बदलाविरोधात विद्यार्थी आक्रमक झाले आहेत. या आंदोलनाचे पडसाद गुरुवारी पुन्हा दिसून आले आहेत. स्वामी विवेकानंदाच्या पुतळ्याची तोडफोड केल्यानंतर भाजपचे खासदार राकेश सिन्हा यांनी आरोपींना कडक शिक्षा करण्यात यावी अशी मागणी केली आहे. तसंच, जेएनयूमध्ये देशविरोधी विचारधाराला वाव मिळत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. विद्यापीठात राष्ट्रविरोधी तत्वे पसरवणाऱ्याची ओळख पटवून त्याला ताबडतोब या परिसरातून बाहेर काढले जावे अशी मागणी त्यांनी केली आहे. 

पाकची दहा वर्षांची प्रतिक्षा संपली, मायदेशात कसोटी मालिका ठरली

दरम्यान, सोमवारी फी वाढीविरोधात विद्यार्थ्यांनी आक्रमक होत विद्यापीठाच्या समोरील रस्त्यावर आंदोलन केले. या आंदोलनावेळी पोलिस आणि आंदोलनकर्त्यांमध्ये वाद झाला होता. विद्यार्थ्यांचा वाढता विरोध पाहता विद्यापीठ प्रशाननाने फी वाढीचा निर्णय मागे घेतला असल्याचे सांगितले. तरी सुध्दा जेएनयूमध्ये संतप्त विद्यार्थ्यांनी कुलगुरू कार्यालयावरील नेमपेट तोडली आणि स्वामी विवेकानंद यांच्या पुतळ्याची तोडफोड करत अपशब्द लिहिले आहेत. 

'लोकसभा निवडणुकीतही हारले आणि आता सुप्रीम कोर्टातही'