पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

मालदीवच्या संसदेतून मोदींचा पाकिस्तान, चीनवर निशाणा

पंतप्रधान नरेंद्र मोदी

मालदीवच्या संसदेतील ऐतिहासिक भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दहशतवादावरुन पाकिस्तानला घेरले. तर दुसरीकडे कर्जाच्या जाळ्यात अडकवण्याच्या चीनच्या चालीवरही निशाणा साधला. पंतप्रधान म्हणाले की, दहशतवाद हे आपल्या काळातील एक मोठे आव्हान आहे. पाकिस्तानचे नाव न घेता मोदी म्हणाले की, लोक आताही चांगला दहशतवादी आणि वाईट दहशतवादी असा भेद करण्याची चूक करत आहेत, हे दुर्देव आहे. दहशतवादाशी सामना करण्यासाठी सर्व मानवतावादी शक्तींनी एकजूट होणे गरजेचे आहे, असे आवाहन त्यांनी केले.

मालदीवः पंतप्रधान मोदींना निशान इज्जुद्दीन पुरस्कार प्रदान

मालदीवला संदेश देताना ते म्हणाले की, आपण मित्र आहोत आणि मित्रत्वात कोणी छोटा किंवा मोठा नसतो. भारताची विकासाची भागिदारी ही लोकांना सशक्त करण्यासाठी आहे. त्यांना कमकुवत करणे किंवा भावी पिढीवर कर्जाचे ओझे लादण्यासाठी नाही. दरम्यान, चीनने मालदीवला मोठे कर्ज देऊन त्यांना संकटात आणले आहे. 

क्रिकेट टीम तयार करण्यास भारत मदत करेल, मालदीवला अपेक्षा

काय म्हणाले मोदी..

दहशतवाद आपल्या काळातील एक मोठे आव्हान आहे. हा धोका एका देशाला किंवा एका क्षेत्रासाठी नाही. हा धोका संपूर्ण मानवतेला आहे. दहशतवादी हल्ल्यात निर्दोष व्यक्तींचा बळी गेला नाही, असा एकही दिवस गेला नाही. दहशदवाद्यांची ना स्वतःची बँक असते ना टांकसाळ आणि ना ही शस्त्रास्त्रांचा कारखाना नाही. तरीही त्यांच्याकडे धन, हत्यारांची कमतरता नसते. हे सर्व कोठून येते. कोण देतो त्यांना ही सुविधा ? पाकिस्तानवर निशाणा साधताना मोदी म्हणाले की, दहशतवादला प्रायोजित करणे हा सर्वांत मोठा धोका बनला आहे. 

लोक अजूनहूी चांगला दहशतवादी आणि वाईट दहशतवादी असा भेद करुन चूक करतात, हे दुर्देवी आहे. कृत्रिम मतभेद करत आम्ही खूप वेळ वाया घालवला आहे. पाणी आता डोक्यावरुन जात आहे. दहशतवादाविरोधात लढण्यासाठी सर्व मानवतावादी शक्तींनी एकजूट होण्याची गरज आहे.