पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

'भाजपच्या पराभवात आपला आनंद शोधणे काँग्रेसने बंद केले पाहिजे'

काँग्रेस

दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या निकालातून तिथे पुन्हा एकदा आम आदमी पक्षाचे सरकार येणार हे स्पष्ट झाले आहे. पण याच निकालातून दिल्लीमध्ये काँग्रेसचा सुपडासाफ झाल्याचेही दिसून आले. गेल्यावेळेप्रमाणेच यंदाही काँग्रेसला एकाही जागेवर विजय मिळवता येणार नसल्याचे चित्र आहे. काँग्रेसच्या मतांच्या टक्केवारीतही यावेळी मोठी घट झाली. देशातील प्रमुख राष्ट्रीय पक्षाला राजधानीमध्येच सलग दुसऱ्यांदा लाजीरवाण्या पराभवाला सामोरे जावे लागले आहे. दिल्लीमध्ये काँग्रेसने १५ वर्षे राज्य केले होते.

Delhi Election Results: भाजपसाठी दिल्ली निकालाचा अर्थ काय ?

या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर पक्षाचे नेते आणि प्रवक्ते रणदीप सुर्जेवाला म्हणाले, अत्यंत नम्रपणे आणि मान खाली करून आम्ही दिल्लीकरांनी दिलेला निकाल स्वीकारतो. काँग्रेसचे पुनरुज्जीवन करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. या निकालातून आम्हाल नवी शिकवण मिळाली आहे. निकालांमुळे आम्ही निराश झालेलो नाही. पण आम्हाला निश्चयी करण्यास मदत केली आहे.

दिल्ली काँग्रेसच्या नेत्यांनी या निकालानंतर आता पक्षाने कृती करण्यास सुरुवात केली पाहिजे, असे म्हटले आहे. आता कृतीची वेळ आलीये. केवळ चिंतन करणे थांबले पाहिजे, असे काँग्रेस नेत्यांनी म्हटले आहे. काँग्रेस नेते जयवीर शेरगील म्हणाले, पराभवाचा स्वीकार करणे आणि चिंतनाच्या नावाखाली शांत राहणे आता बंद केले पाहिजे. केवळ भाजपच्या पराभवात आपला आनंद शोधणेही पक्षाने बंद केले पाहिजे.

विजयानंतर केजरीवाल म्हणाले, दिल्लीवासियांनो 'आय लव यू!'

काँग्रेसचे खासदार प्रतापसिंह बाजवा म्हणाले, भाजपच्या समाजात दुफळी पाडणाऱ्या राजकारणाविरोधात ज्यांना मतदान करायचे होते. त्यांच्याकडे आप आणि काँग्रेस असे दोन पर्याय होते. मतदारांनी काँग्रेसऐवजी आपची निवड केली आहे.