पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

पंतप्रधान मोदी श्रीलंकेत, कोलंबो स्फोटातील मृतांना वाहिली श्रद्धांजली

पंतप्रधान नरेंद्र मोदी (NaremdraModi/Twitter)

दुसऱ्यांदा सत्तेवर आल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आपल्या पहिल्या विदेश दौऱ्यातील दुसऱ्या टप्प्यात रविवारी श्रीलंकेत पोहोचले आहेत. कोलंबोतील भंडारनायके आंतरराष्ट्रीय विमानतळावर श्रीलंकेचे पंतप्रधान रानिल विक्रमसिंघे यांनी पंतप्रधान मोदींचे स्वागत केले. त्यानंतर मोदी हे कोलंबोतील सेंट अँटनी चर्चला पोहोचले आणि एप्रिलमध्ये आत्मघातकी हल्ल्यात ठार झालेल्या मृतांना श्रद्धांजली वाहिली. ईस्टर बॉम्बस्फोटानंतर पंतप्रधान मोदी श्रीलंकेत पोहोचणारे पहिले विदेशी नेते आहेत.

आपल्या एकदिवसीय दौऱ्यादरम्यान पंतप्रधान मोदी श्रीलंकेचे राष्ट्राध्यक्ष मैत्रिपाल सिरिसेना, पंतप्रधान विक्रमसिंघे आणि विरोधी पक्षनेते मंहिदा राजपक्षे यांच्याशी चर्चा करतील. श्रीलंकेतील मुख्य तामिळ पक्ष-द तामिळ नॅशनल अलायन्सच्या प्रतिनिधींशीही ते चर्चा करण्याची शक्यता आहे.

एप्रिलमध्ये ईस्टरवरील आत्मघातकी दहशतवादी हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदी यांच्या या दौऱ्याकडे श्रीलंकेप्रती एकजुटता जाहीर करण्याच्या प्रतिकाच्या स्वरुपात पाहिले जात आहे. मोदींनी सेंट अँटनी चर्चमध्ये झालेल्या स्फोटातील मृतांना श्रद्धांजली वाहिली. २१ एप्रिलला इस्लामिक स्टेसच्या दहशतवाद्यांनी श्रीलंकेतील वेगवेगळ्या शहरांमध्ये आत्मघातकी स्फोट घडवल्यामुळे २५० हून अधिक लोक मारले गेले होते.