पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

'पुन्हा निवडणूक' ट्विट करणाऱ्या मराठी कलाकारांवर सचिन सावंत यांचे आरोप

#पुन्हानिवडणूक हा हॅशटॅग ट्रेंडमध्ये

 प्रथितयश मराठी कलाकार एकाच वेळी  #पुन्हानिवडणूक हा हॅशटॅग वापरून राजकीय ट्वीट करत आहेत, भाजपातर्फे राजकीय ट्विट करण्यासाठी या कलाकारांना पैसे दिले जात आहेत, असा गंभीर आरोप काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी केला आहे. राज्यात सध्या जे राजकीय वातावरण आहे त्यामुळे सामान्य नागरिक त्रस्त आहेत. राज्यात राष्ट्रपती राजवट आहे. मुख्यमंत्रीपदाचा तिढा अजूनही सुटला नाही. निवडणुकांचे निकाल लागूनही बडे राजकीय पक्ष राज्यात सत्ता स्थापन करायला अयशस्वी ठरले.  अशा वातावरणात मराठी कलाकारांनी केलेल्या #पुन्हानिवडणूक या ट्विटनं सर्वांचं लक्ष वेधलं. मात्र हे ट्विट सध्याच्या राजकीय परिस्थितीवर नसून हे चित्रपटाच्या प्रमोशनचं ट्विट असल्याचीही चर्चा आहे.

रेल्वेत चहा-नाश्ता, जेवण महागणार, जाणून घ्या नवे दर

मराठी कलाकार हे आगामी 'धुरळा' चित्रपटाचे प्रमोशन करत असून या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी ते #पुन्हानिवडणूक हा हॅशटॅग वापरत असल्याचं म्हटलं जात आहे. 

'प्रथितयश मराठी कलाकार एकाच वेळी एकच हॅशटॅग वापरून राजकीय ट्वीट करतात हे आश्चर्याचे तर आहेच पण @BJP4Maharashtra ची propaganda मशीनरी किती पोचलेली आहे हे यातून दिसून येते.' असा आरोप सचिन सावंत यांनी ट्विटद्वारे केला. त्याचप्रमाणे  'या कलाकारांनी आपला #भाजपा कडून वापर होऊ देऊ नये. भाजपाच्या आयटी सेलचा या कलाकारांशी काय संबंध आहे? याची पोलिसांकडून चौकशी झाली पाहिजे. कोब्रापोस्ट ने या अगोदर बॉलिवूडच्या कलाकारांचे स्टिंग ऑपरेशन केले आहे. त्यात भाजपातर्फे राजकीय ट्विट करण्यासाठी पैसे ऑफर केले जाते हे स्पष्ट झाले आहे.' असंही त्यांनी म्हटलं आहे.

प्रार्थनांना यश लतादीदींची तब्येत सुधारतेय, कुटुंबीयांची माहिती

#पुन्हानिवडणूक हॅशटॅग वापरणाऱ्या मराठी कलाकारांना सोशल मीडियावरही ट्रोल केले गेले. मात्र #पुन्हानिवडणूक ट्विट करण्यामागे नेमकं काय कारण आहे हे कलाकारांनी अद्यापही उघड केले नाही. 

अक्षयच्या 'पृथ्वीराज'मधून मिस वर्ल्ड मानुषी करणार बॉलिवूडमध्ये पदार्पण