पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

विमानाच्या देखभालीचे काम करताना दरवाजात अडकून स्पाईसजेटच्या तंत्रज्ञाचा मृत्यू

स्पाईसजेट

कोलकातामधील नेताजी सुभाषचंद्र बोस आंतरराष्ट्रीय विमानतळावर घडलेल्या विचित्र घटनेमध्ये मंगळवारी रात्री एका तंत्रज्ञाचा मृत्यू झाला. स्पाईसजेट विमान कंपनीच्या विमानाच्या दरवाज्याचे काम करीत असताना तो अचानक बंद झाल्याने त्यामध्ये सापडून या तंत्रज्ञाचा मृत्यू झाला. मंगळवारी रात्री पावणे दोनच्या सुमारास ही घटना घडली.

कोलकाता विमानतळावरील अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, बम्बार्डिअर क्यू ४०० या विमानाच्या लॅंडिंग गिअरचे काम तंत्रज्ञाकडून केले जात होते. त्यावेळी अचानक दरवाजा लागल्यामुळे तंत्रज्ञ त्यामध्ये सापडला. त्यातच त्याचा मृत्यू झाला. विमानाच्या नैमित्तिक देखभालीचे काम सुरू असताना ही दुर्घटना घडली आहे.

दरम्यान, या प्रकरणात स्पाईसजेटकडून अद्याप कोणतेही निवेदन जारी करण्यात आलेले नाही.