पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

विमानात बसण्याच्या जागेवरून प्रज्ञासिंह ठाकूर आणि प्रवाशांमध्ये वाद

प्रज्ञा सिंह ठाकूर यांच्यावर भाजपची कारवाई

विमानात बसण्याच्या जागेवरून भोपाळमधील भाजप खासदार प्रज्ञासिंह ठाकूर आणि प्रवासी, विमान कर्मचारी यांच्यात वादावादी झाला. याचा व्हिडिओ सोमवारी सोशल मीडियात फिरतोय. स्पाईसजेटच्या विमानाने दिल्लीहून भोपाळला येत असताना ही घटना घडली.

व्हिडिओतील दृश्य़ांवरून विमानातील सहप्रवासी आणि प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यात शाब्दिक वादावादी होत असल्याचे दिसते. प्रज्ञासिंह ठाकूर या स्पाईसजेटच्या विमानात आधीच एका प्रवाशाला दिलेल्या जागेवर बसल्या होत्या. त्यावरून वाद सुरू झाल्याची माहिती आहे. इतर काही प्रवासी प्रज्ञासिंह ठाकूर यांना त्यांचे वागणे योग्य नसल्याचे सांगतात. त्या जनतेच्या प्रतिनिधी आहेत. त्यांनी विमानातील प्रवाशांना त्रास देऊ नये. त्यांनी पुढच्या विमानाने यावे, असे काही प्रवासी त्यांना सांगत आहेत. पण प्रज्ञासिंह ठाकूर त्यांचे ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हत्या.

ज्योतिरादित्य शिंदेंना पराभूत करणाऱ्या भाजप खासदारावर गुन्हा दाखल

मी विमानातील कर्मचाऱ्यांकडे नियम पुस्तिका दाखविण्याची मागणी केली. त्यांनी मला ही पुस्तिका दाखवली आणि मला योग्य वाटले तर मी स्वतःहून खाली उतरेन, असे प्रज्ञासिंह ठाकूर म्हणताना दिसतात. विमानात प्रथम श्रेणीच्या जागा नसल्याबद्दलही त्या तक्रार करताना दिसतात.

प्रज्ञासिंह ठाकूर यांनी या प्रकरणी भोपाळमधील हवाई वाहतूक संचालकांकडे तक्रार केली आहे. विमानात मी जी जागा आरक्षित केली होती. ती मला देण्यात आली नाही. विमानातील कर्मचाऱ्यांचे वागणेही योग्य नव्हते, असे त्यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे.

तुला मानलं रे ठाकूर! विराटकडून शार्दुलचं मराठीतून कौतुक

या संदर्भात स्पाईसजेटने रविवारी प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, आधीच इतर प्रवाशाला दिलेल्या जागेवर बसण्यास प्रज्ञासिंह ठाकूर यांना मनाई करण्यात आली. नियमाप्रमाणे असे करता येत नाही. व्हिलचेअरवरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना इमर्जन्सी रांगेमधील जागेवर बसू दिले जात नाही, असेही विमान कंपनीने म्हटले आहे.