पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

सोनिया, राहुल आणि प्रियांका गांधी यांची SPG सुरक्षा काढली

सोनिया गांधी, प्रियांका गांधी, राहुल गांधी

काँग्रेसच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी, माजी अध्यक्ष राहुल गांधी आणि पक्षाच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांना देण्यात आलेल्या सुरक्षेचा आढावा घेतल्यानंतर त्यांना देण्यात आलेली विशेष सुऱक्षा दलाची (एसपीजी) सुरक्षा काढण्यात आली आहे. यापुढे या तिन्ही नेत्यांना नॅशनल सिक्युरिटी गार्ड (एनएसजी) किंवा केंद्रीय राखीव पोलिस दलाची (सीआरपीएफ) सुरक्षा पुरविण्यात येणार आहे. या विषयावर कोणतीही प्रतिक्रिया देण्यास केंद्रीय गृह मंत्रालयाने नकार दिला आहे.

'आमदारांबद्दल शंका घेणाऱ्या काँग्रेस-राष्ट्रवादीने जनतेची माफी मागावी'

केंद्र सरकारमधील वरिष्ठ अधिकारी म्हणाले, एसपीजीकडून सुरक्षा पुरविण्यात येणाऱ्या प्रत्येक अतिमहत्त्वाच्या व्यक्तीच्या सुरक्षेचा दरवर्षी आढावा घेतला जातो. सध्या गांधी कुटुंबाच्या सुरक्षेचा आढावा घेतल्यानंतर त्यांना एसपीजीऐवजी दुसऱ्या यंत्रणांकडून सुरक्षा देण्यात यावी, अशी शिफारस करण्यात आली आहे. गांधी कुटुंबाच्या जीविताला कोणताही नवा धोका नसल्याचेही आढाव्यात दिसून आले आहे.

काँग्रेस शिवसेनेचा पाठिंबा घेईल का, शरद पवारांचा सवाल

माजी पंतप्रधान दिवंगत इंदिरा गांधी यांची हत्या झाल्यानंतर १९८५ मध्ये एसपीजी सुरक्षा सुरू करण्यात आली होती. पंतप्रधान आणि त्यांच्या कुटुंबियांना एसपीजी सुरक्षा पुरविली जाते. त्यानंतर १९९२ मध्ये माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हत्येनंतर माजी पंतप्रधान आणि त्यांच्या जवळच्या कुटुंबियांना एसपीजी सुरक्षा देण्यात येऊ लागली आहे.